Verification: 4e7838d05962b884

गुजरातने(Gujarat) ‘वतन प्रेम योजना’ (Watan Prem Yojana) सुरू केली

Spread the love

वतन प्रेम योजनेच्या (Watan Prem Yojana) नियामक मंडळाकडुन दि. 4 सप्टेंबर 2021 रोजी पहिली बैठक संपन्न

RajeNews_SEP_7_2021

Watan Prem Yojana
Watan Prem Yojana

गुजरातचे (Gujarat) मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी गांधीनगरमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार ‘वतन प्रेम योजने’चा (Watan Prem Yojana) तपशील मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आला. यामध्ये नियामक मंडळाने प्रस्तावित 1,000 कोटी रुपयांची कामे डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण केली जातील. असे सांगण्यात आले आहे.

या वतन प्रेम योजने’च्या (Watan Prem Yojana) सुरळीत अंमलबजावणीसाठी नियामक मंडळाने प्रकल्प व्यवस्थापन युनिटची स्थापना केली आहे. नियामक मंडळाने देणगीदारांना त्यांचे पैसे ऑनलाईन पाठवण्याची सोय केली आहे. या योजनेअंतर्गत, अनिवासी गुजराती (NRGs) आणि अनिवासी भारतीय ग्रामस्तरीय प्रकल्पाच्या खर्चाच्या 60% योगदान देऊ शकतात. उर्वरित 40% रक्कम राज्य सरकार भरणार आहे. अशी माहिती देण्यात आली.

‘वतन प्रेम योजना’ हे गुजरात (Gujarat) राज्य सरकारच्या ‘मदर-ए-वतन’ (Watan Prem Yojana) योजनेचे अध्यावत स्वरुप आहे. या योजनेच्या जुन्या पध्दतीनुसार राज्य सरकार आणि अनिवासी भारतीयांचे योगदान 50:50 होते.

वतन प्रेम योजनेमध्ये ग्रामस्तरीय प्रकल्पांचा समावेश केला जाणार आहे. त्यानुसार, शाळा आणि ग्रंथालयांमध्ये स्मार्ट क्लासरूमची निर्मिती होणार आहे. त्याचबरोबर सामुदायिक इमारत, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि अंगणवाडीची सुविधा उपलब्ध होणार आहे. शिवाय सुरक्षेसाठी सीसीटीव्हीची यंत्रणाही कार्यान्वीत करण्यात येणार आहे. तसेच पाण्याचे पुनर्वापर, निचरा, सांडपाणी प्रक्रिया आणि तलावांचे सौंदर्यीकरण वाढविण्यासाठीही कार्य करण्यात येणार आहे. याबरोबरच बस स्टँड, सौर ऊर्जेवर चालणारे पथदिवे बसविण्याचे कामही या योजनेतुन होणार आहे.

More News –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *