Verification: 4e7838d05962b884

ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांचं निधन

Spread the love
ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांचं आज निधन झालं आहे. त्यांनी गायन व संगीत नाट्यात मोलाची कामागिरी केली होती. वयाच्या 70 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
कीर्ती शिलेदार

ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांचं आज निधन झालं आहे. त्यांनी गायन व संगीत नाट्यात मोलाची कामागिरी केली होती. वयाच्या 70 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

कीर्ती यांनी जयराम शिलेदार यांच्यासोबत मोलाची कामगिरी बजावली. त्यांच्या कार्यकाळात अनेक भूमिका लोकप्रिय झाल्या. लहान वयात त्यांनी पदार्पण केलं. नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळही त्यांनी 2018 मध्ये सांभाळला.

रंगभूमी आणि रुपेरी पडदाही गाजवलेले प्रख्यात अभिनेते चित्तरंजन कोल्हटकर यांचे जन्मशताब्दी वर्ष १५ जानेवारीला सुरू झाले. त्यानिमित्त एका दिग्दर्शकाने त्यांच्या आठवणींना दिलेला उजाळा.

वयाच्या दहाव्या वर्षी कीर्तीताईंनी रंगभूमीवर पदार्पण केलं. अभिनयाने व गायनाने रंगभूमीवर एक वेगळाच ठसा त्यांनी उमटवला. वडील जयराम शिलेदार यांनी व्ही. शांताराम यांच्या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या. त्याचबरोबर आई जयमाला यांना भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला होता.