Verification: 4e7838d05962b884

2022 राजर्षी शाहू पुरस्कार डॉ जनार्दन वाघमारे ( Dr. Janardan Waghmare ) यांना जाहीर

Spread the love

प्रतिष्ठेचा राजर्षी शाहू पुरस्कार ( Rajarshri Shau Award ) नांदेड इथल्या रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ जनार्दन वाघमारे ( Dr. Janardan Waghmare ) यांना जाहीर झाला आहे. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी या पुरस्काराची घोषणा केली. 1 लाख रूपये रोख, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.

२६ जूनला म्हणजेच येत्या शाहू जयंतीदिनी कोल्हापूरात शाहू स्मारक भवनात या पुरस्कार वितरण होईल, अशी माहिती त्यांनी दिली. मागील वर्षीचे या पुरस्काराचे मानकरी डॉ. तात्याराव लहाने यांनाही यावेळी पुरस्कार देण्यात येणार आहे.

डॉ जनार्दन वाघमारे हे इंग्रजीचे ( English )प्राध्यापक, निग्रो ( Nigro ) साहित्याचे भाष्यकार, दलित, पुरोगामी साहित्य चळवळीचे अभ्यासक आणि शिक्षणतज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यांनी प्राध्यापक, प्राचार्य, कुलगुरू आणि राज्यसभेचे खासदार अशा विविध पदांच्या माध्यमातून योगदान दिलं आहे.

प्रतिष्ठेचा राजर्षी शाहू पुरस्कार ( Rajarshri Shau Award ) नांदेड इथल्या रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ जनार्दन वाघमारे ( Dr. Janardan Vaghmare ) यांना जाहीर झाला आहे.