Verification: 4e7838d05962b884

Top 5 News Today | दिवसभरातील 5 महत्वाच्या बातम्या

Spread the love

Top 5 News Today

Paris Olympics 2024 Day 12 |

भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये एकूण 3 पदके जिंकली आहेत. ही सर्व पदके नेमबाजीत आली आहेत. मीराबाई चानूही महिलांच्या 49 किलो मध्ये खेळणार आहे. टेबल टेनिस, गोल्फ आणि ॲथलेटिक्सच्या अनेक स्पर्धांमध्ये भारत दमदार कामगीरी करेल अशी सर्वांना आशा आहे.

Bangladeshi Hindus on India-Bangladesh Border BSF |

बांगलादेशात अजूनही तणावपूर्ण परिस्थिती आहे. शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर हिंदू बांगलादेशींवर अत्याचाराचे आरोप होत आहेत. पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथील India-Bangladesh सीमेवर १ हजाराहून अधिक बांगलादेशी हिंदू पोहोचले आहेत. त्यांना सीमा ओलांडून भारतात यायचे आहे. BSFने भारतात घुसखोरीचे प्रयत्न थांबवले आहेत. बीएसएफने त्यांना सातकुरा सीमेवर रोखले आहे.

Indian Share Market Tata Power |

टाटा समूहाच्या समभागांनी दीर्घकालीन गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. असाच एक स्टॉक टाटा पॉवर आहे, ज्याने दीर्घकाळात उत्कृष्ट वाढ दर्शविली आहे. जून तिमाहीच्या निकालानंतर टाटा पॉवरच्या शेअर्समध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहेत. या टाटा वीज पुरवठादार कंपनीचा एकात्मिक निव्वळ नफा चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून तिमाहीत 31 टक्क्यांनी वाढून 1,189 कोटी रुपये झाला आहे.

Indian Railway Recruitment 2024 |

Indian Railway Recruitment 2024 | 10th & 12th पाससाठी Indian Railway बंपर भरती, असा करा नोकरीसाठी अर्ज!

भारतीय रेल्वेने ॲप्रेंटिसशिपसाठी 3000 पदांवर भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्ज प्रक्रिया 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरपर्यंत सुरु असणार आहे. अर्ज करण्यासाठी wcr.indianrailways.gov.in या वेबसाइट तुम्ही भेट देऊ शकता. एकूण 3317 पदांसाठी ही भरती होत आहे. ही अर्ज प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे.

Indian Space Research Organization ISRO |

लवकरच आपला नवीनतम पृथ्वी निरीक्षण उपग्रह म्हणजेच EOS-8 प्रक्षेपित करणार आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपण होणार आहे. 175.5 किलो वजनाचा हा उपग्रह पर्यावरण निरीक्षण, आपत्ती व्यवस्थापन आणि तांत्रिक प्रात्यक्षिकांसाठी काम करेल.

EOS-8 मध्ये तीन विशेष अत्याधुनिक पेलोड आहेत – इलेक्ट्रो ऑप्टिकल इन्फ्रारेड पेलोड (EOIR), ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम रिफ्लेक्टोमेट्री पेलोड (GNSS-R) आणि SiC UV डोसीमीटर. यामध्ये EOIR दिवसा आणि रात्री मध्य आणि लांब लहरी इन्फ्रारेड छायाचित्रे घेईल. हा उपग्रह 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9.17 वाजता प्रक्षेपित केला जाईल.