Verification: 4e7838d05962b884

Varsha CM Bungalow Maharashtra | मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याला वर्षा नाव कसं पडलं? | Ekanth Shinde | Devendra Fadnaivs

Spread the love
New Project 4

Varsha CM Bungalow Maharashtra | मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेला वर्षा बंगला हा कायम महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत असतो. वर्षा बंगला पूर्वी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान आणि त्याचे नावही वर्षा असं नव्हतं. मग या बंगल्याला वर्षा असं नाव कसं पडलं पाहूयात..

वसंतराव नाईक कृषिमंत्री झाले तेंव्हा एक बंगला राहण्यासाठी देण्यात आला. त्याचे नाव डग बीगन. हा बंगला अगदीच साधा, बैठी बांधणी, सगळीकडून मोकळे दरवाजे असा होता. त्याच्या शेजारीच मुख्यमंत्र्यांचा सह्याद्री हा बंगला भव्य दिव्य होता…नाईक म्हणाले, छान आहे हे घर. बंगल्यामध्ये येणा-या कोणालाही परकेपणा वाटणार नाही. त्याला घराचा मोकळेपणा होता. मुलगा अविनाशच्या वाढदिवशी 7 नोव्हेंबर 1956 रोजी नाईक कुटुंब डग बीगनवर राहायला आले. वसंतराव नाईकांचा पाऊस हा आत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. त्यामुळे आल्या दिवशीच Vasantraon Naik यांनी डग बीगनच नामांतर वर्षों असं केलं. मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांच्या आकस्मिक निधनानंतर वसंतराव नाईक यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. 5 डिसेंबर 1963 रोजी त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पहिली बैठक संपवून नाईक वर्षा बंगल्यावर परतले. तेव्हा घरचे वाट पाहत होते. घरचांना वाटलं की आता सह्याद्रीवर आपलं बस्तान हलवावं लागणार. त्यांची चर्चा झाली…आता तर आम्ही इथं रूढलोच आहोत. आता सह्यादी नको की दुसरा कोणता बंगला. आपण इथ खूश आहोत. वसंत, वत्सला आणि वर्षा- व अक्षरानं सुरू झालेली ही नाव आहेत. खरंच वर्षा बगला आपल्याला भाग्याचा ठरेल? आणि ठरलं इथचं राहायचं. तेंव्हापासून मुख्यमंत्र्यांचे निवसस्थान हा वर्षा बंगला आहे. राज्याशी संबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय, राजकीय आडाखे, मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबाशी संबंधित विविध क्षण या सगळ्यांचा साक्षीदार म्हणजे ‘वर्षा’ बंगला.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी 20 फेब्रुवारी 1975 रोजी मुख्यमंत्री पदावरून पायऊतार झाले आणि तब्बल 19 वर्षे ते वर्षा बंगल्यावर होते. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर नाईक यांनी वर्षा बंगल्यातील वास्तव्य हलविलं, आणि पुसद गाठलं, पण आजही मुख्यमंत्र्यांचा बंगला म्हणून वर्षांचं स्थान कायम आहे.