Verification: 4e7838d05962b884

Mahapalika Election | ‘मिनी विधानसभे’च्या निवडणुकांचा बिगुल कधी वाजणार?

Spread the love
New Project 5 1

Mahapalika Election | विधानसभा निवडणुकीत महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भारतीय जनता पार्टीने Vidhansabha Election एकूण 288 पैकी तब्बल 132 जागा जिंकल्या. तर, महायुतीला तब्बल 230 जागांवर विजय मिळालाय. मंत्र्यांचा शपथविधीही झाला, हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. यानंतर आता वेध लागलेत ते मिनी विधानसभा म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची…

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यकाळ 2021 मध्ये संपला. तीन वर्षे उलटली तरी निवडणुका झालेल्या नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मागील 3 वर्षांपासून प्रशासक कारभार पाहत आहेत.

त्यामुळं निवडणुका लवकर व्हाव्या असं वाटत असलं तरी प्रभाग रचना, OBC Reservation, Voting List तयार करणे यासाठी वेळ लागु शकतो. त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल तुर्तास लागणे शक्य नसल्याचे बोलले जात आहे. राज्यभरात एकुण ६२२ संस्थांची निवडणूका होणार आहेत.

राज्यातील तत्कालीन MVA आघाडीने स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्रभागांची, सदस्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला होता. पण महायुतीने या निर्णयाला स्थगिती दिली आहे. तसेच प्रभागसंख्या आणि सदस्यसंख्या पूर्ववत करण्यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रभागांची पुनर्रचना होणार की नाही हे समजणार आहे. तसेच मतदार याद्यांचे नुतनीकरण, ओबीसी आरक्षण असे अनेक प्रश्न असल्याने तुर्तास तरी निवडणुकांना दिरंगाई होण्याची शक्यता आहे.