Verification: 4e7838d05962b884

Dhananjay Munde यांना पुन्हा मंत्रिपद मिळणार? | Political News | Raje News Marathi

Spread the love

Political News | Dhananjay Munde पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात स्थान देण्यात येईल का? असे वारे सध्या राजकारणात वाहू लागले आहेत. राष्ट्रवादीचे प्रमुख नेते असलेल्या मुंडें राज्यातील राजकारणात प्रभावशाली नेते मानले जातात. मागील काही दिवसांपासून ते वादात सापडलेत. त्यामुळं त्यांना मंत्रीपदही सोडावं लागलं. पण त्यांच्या कार्यक्षमतेच्या आधारे मुख्यमंत्री Ekanth Shinde आणि उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांच्या मंत्रिमंडळात त्यांना पुन्हा जबाबदारी मिळेल का अशी चर्चा आहे. त्यामुळं Beed जिल्ह्यातील समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

New Project 25

कृषिमंत्री असताना धनंजय मुंडे यांच्या काळात झालेल्या खरेदीत घोटाळा प्रकरणी चोकशीच्या फेऱ्याचा त्यांना सामना करावा लागला. पण चौकशीत ते दोषी नसल्याचे आढळले. चौकशीत मुंडेंना क्लिन चिट दिली गेली.

पण सध्या तरी आणखी एका प्रकरणाची चौकशा सुरु आहे. त्यात त्यांचा संबंध नसल्याचे समोर आले तर धनंजय मुंडे यांना पुन्हा संधी देऊ,’ असे खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच सांगितले. त्यामुळे मुंडेंच्या पुनर्वसनाचे संकेतच देऊन टाकलेत. पण Anjali Damaia या सामाजिक कार्यकर्यांनी धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेऊ नये अशी भूमीका मांडली आहे.

कृषिमंत्री असताना धनंजय मुंडेंवर खात्यातील घोटाळ्याप्रकरणी आरोप करण्यात आले, त्यामुळं त्यांना मंत्रिपदही सोडावे लागले होते. दरम्यान हे खातं Manikrao Kokate यांच्या पदरात पडलं. पण वादग्रस्त विधानांमुळे कोकाटे जनतेच्या रडारवर आलेत. थेट राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. कोकाटे यांच्याबाबत मंगळवारी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असं अजितदादांनी सांगितलं. त्यामुळं जर कोकाटेंचं मंत्रिपद गेलं तर ते मुंडेंना परत मिळणार का? अशी चर्चा सुरु आहे.

तुम्हाला काय वाटतं मुंडेंना मंत्रिपद मिळावं? आम्हाला कमेंट करुन नक्की सांगा