Verification: 4e7838d05962b884

Aaditya Thackeray : पुण्यात येणारा मोठा प्रोजेक्ट गुजरातला

Spread the love

Aaditya Thackeray: पुण्यात मोठा प्रकल्प येणार होता. तो आता गुजरातला ( Gujrat ) हालवण्यात आल्याने खोके सरकार म्हणत आदित्य ठाकरेंनी संताप व्यक्त केला आहे. मुंबई – महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेण्याचे काम सुरू आहे. असे आरोप अनेकदा भाजपवर केले आहेत. आदित्य ठाकरे यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. तसेच खोके सरकार राजकारणात व घराघरात फिरण्यात व्यस्त असल्याची टिकाही यावेळी आदित्य यांनी केली.

download 10
Aaditya Thackeray

वेदांता-फॉक्सकॉननं आपला सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातमध्ये सुरू करणार असल्याचे स्पष्ट केले. चेअरमन अनिल अग्रवाल यांच्या ट्वीटचा दाखला देत त्यांनी दावा केला.

खोके सरकार फिरण्यात व्यस्त आहे. त्यामुळे प्रशासनावर कोणाचाच अंकुश नाही. पिस्तुल काढणं, धक्काबुक्की करणं, गुंडगिरी करणे सोडून द्या. त्याचबरोबर मोठ्या इंडस्ट्रीजना राज्यात आणावे त्यामुळे बेरोजगारांना रोजगार मिळेल असा हल्लाबोल ठाकरे यांनी केला. ( Aaditya Thackeray: Aaditya Thackeray angered by calling Gujarat, a box government, the big project coming in Pune )

Join Whatsapp for Daily Updates

https://chat.whatsapp.com/DbUd8DoK4SjK2Jwss1yMxZ

%d bloggers like this: