Verification: 4e7838d05962b884

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंचा महाविकास आघाडीला घरचा आहेर

Spread the love

Aaditya Thackeray Shivsena : मागच्या 25 वर्षात काँग्रेस-राष्ट्रवादी प्रणीत सरकार होते. त्यानंतर आघाडी फोडून 2014 ला राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार अस्थित्वात आले. यानंतर राज्याचे राजकारणात बदल झाले. 2019 मध्ये नवीन आघाडी जन्मली. राष्ट्रवादी-काँग्रेस-शिवसेना ही नवी आघाडीची स्थापना झाली.

Blue and Yellow Gradient Meditation Youtube Thumbnail 1
Aaditya Thackeray

मागील अडीच वर्षाच्या काळात सरकारने अनेक निर्णय घेतले. त्यानंतर शिवसेनेत ( Shivsena ) फूट पडली. एकनाथ शिंदे यांनी बंड केला. भाजप बरोबर नवे सरकार बनविले. या सरकारने महाविकास आघाडीचे अनेक निर्णय स्थगित केले. याकाळातील वरळी बीडीडी गृहप्रकल्पाची पाहणी नेते आदित्य ठाकरे यांनी केले. यावेळी त्यांनी काही क्षणचित्रे ट्विटरवर पोस्ट केली.

आदित्या ठाकरे यांनी ट्विटर बाँबव्दारे अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी- काँग्रेसवर टीकास्त्र डागले आहे. २५ वर्षे सत्तेत असताना सरकारकडून रहिवाशांना फक्त आश्वासने मिळाली. मविआ सरकारने रहिवाशांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पावले टाकली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.