Verification: 4e7838d05962b884

अग्‍निपथ योजना ( Agneepath Scheme 2022 ) महत्वाचा निर्णय…

Spread the love

अग्निपथ योजनेअंतर्गत ( Agneepath Scheme ) सेवेत 4 वर्ष पूर्ण करणाऱ्या अग्निवीरांसाठी ( Agniveers ) केंद्रीय सशस्त्र पोलीस दल ( CAPF ) आणि आसाम रायफल्समधील ( Assam Rifles ) भरतीसाठी 10 टक्के रिक्त जागा राखीव ठेवण्याचा निर्णय गृह मंत्रालयाने ( HMO India ) घेतला आहे. अग्निवीरांना दोन दलात भरतीसाठी उच्च वयोमर्यादेपेक्षा 3 वर्ष वयाची सूट दिली जाईल असे स्पष्ट करण्यात आले. शिवाय अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीसाठी उच्च वयोमर्यादेच्या पुढे ५ वर्षांसाठी वयोमर्यादा शिथिल असेल, असे गृह मंत्रालयाने म्हटले आहे.

अग्निपथ या योजनेअंतर्गत नव्याने भरती होणाऱ्यांसाठी प्रवेशाची वयोमर्यादा 17 वर्षे 6 महिने ते 21 वर्ष अशी निश्चित करण्यात आली होती. पंरतु, गेली दोन वर्षे लष्करात भरती प्रक्रिया सुरू करणे शक्य झाले नसल्याची दखल घेत, सरकारने 2022 साठी प्रस्तावित लष्कर भरतीसाठी वयामध्ये यंदा सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, 2022 अग्नीपथ योजनेतील भरती प्रक्रियेसाठी उच्च वयोमर्यादा 23 वर्षे अशी करण्यात आली आहे.

images
Agneepath Scheme