Verification: 4e7838d05962b884

Agnipath Scheme : भारतीय लष्कराकडून ( Indian Army ) अधिसूचना जारी

Spread the love

केंद्र सरकारनं नुकत्याच सुरू केलेल्या अग्निपथ ( Agnipath ) योजनेअंतर्गत अग्निवीरांच्या भरतीसाठी भारतीय लष्कराकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. भरतीसाठी येत्या जुलै महिन्यापासून नोंदणी सुरू होणार आहे. सैन्य भरती कार्यालयांमध्ये त्याचबरोबर भारतीय लष्कराच्या joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर ही नोंदणी करता येईल.

उमेदवारांना वैद्यकीय तपासणी, शारीरिक, लेखी आणि क्षेत्र चाचण्या देणे गरजेचे आहे. याव्दारे नियमित भरतीसाठी ग्राह्य धरले जाणार आहे. असे स्पष्ट करण्यात आले आहे. शिवाय भरती केलेल्या अग्निविरांची नियुक्ती कोणत्याही रेजिमेंटमध्ये होऊ शकते, त्याचबरोबर बदली होऊ शकते, त्यानंतर अग्निवीर म्हणून चार वर्षांचा सेवाकाळ पूर्ण झाल्यावर, त्यांना निवृत्त केलं जाईल असं या अधिसूचनेत स्पष्ट केलं आहे.

या अग्निवीरांना सेवेत असतांना ३० दिवसांपर्यंतच्या वार्षिक रजेची मंजुरी मिळू शकणार आहे. प्रत्येक तुकडीत आपला सेवा काळ पूर्ण केलेल्या अग्निवीरांना संस्थात्मक गरज आणि धोरणानुसार भारतीय लष्कराच्या नियमित भरतीसाठी अर्ज करायची संधी दिली जाईल. मात्र प्रत्येक तुकड्यांमधले जास्तीत जास्त २५ टक्क्यांपर्तच उमेदवार नियमित भरतीसाठी पात्र असतील असंही या अधिसूचनेत स्पष्ट केलं आहे. नियमीत भरतीत निवडल्या गेलेल्या अग्निविरांना भारतीय लष्करात आखणी १५ वर्षांची सेवा द्यावी लागणार आहे.

चार वर्षांचा सेवाकाळ पूर्ण विविध क्षेत्रांमध्ये रोजगार ( JOB ) मिळवण्याच्यादृष्टीनं सेवा निधी दिला जाणार आहे. तसंच ते ग्रॅच्युइटीसाठी पात्र नसतील. माजी सैनिकांचे आरोग्यविषयक योजनांचे लाभ, कॅन्टीन स्टोअर्स विभागाच्या सुविधा, माजी सैनिकाचा दर्जा आणि इतर संबंधित लाभांसाठी हे निवृत्त अग्निवीर पात्र नसतील. असं या अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले. आपला सेवा काळ पूर्ण केलेल्या अग्निवीरांना त्यांनी आत्मसात केलेली कौशल्य आणि त्यात त्यांनी मिळवलेल्या प्राविण्याविषयीचं कौशल्य प्रमाणपत्रही प्रदान केलं जाणार आहे.

agneepath-recruitment-scheme-army-2022_202206837688
Agniveer Bharati