Verification: 4e7838d05962b884

All About Ratan Tata | प्रेम केलं पण…

Spread the love

All About Ratan Tata | देशातील ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनी जगाचा निरोप घेतला. रतन टाटा यांचे काल रात्री ९ ऑक्टोबर २०२४ रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. रतन टाटा 86 वर्षांचे होते. अनेक दिवसांपासून ते आजारी होते. टाटांच्या निधनानंतर देशभरात शोककळा पसरली आहे. रतन टाटा यांचे पार्थिव कुलाबा येथील त्यांच्या घरी पोहोचले आहे. दुपारी ४ वाजता, रतन टाटा यांचे पार्थिव नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून, त्यानंतर त्यांचे पार्थिव वरळीच्या स्मशानभूमीत नेण्यात येईल, जिथे रतन टाटा यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

New Project 28

Ratan Tata यांचा जन्म 1937 मध्ये झाला

देशातील सर्वात लोकप्रिय उद्योगपती आणि अब्जाधीश रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी झाला. 1991 ते 2012 या काळात ते टाटा समूहाचे अध्यक्ष होते आणि या काळात त्यांनी व्यवसाय क्षेत्रात अनेक विक्रम प्रस्थापित केले आणि देशातील सर्वात जुन्या व्यावसायिक घराण्यांपैकी एक असलेल्या टाटा समूहाला मोठ्या उंचीवर नेले.

टाटा सन्सला नव्या उंचीवर नेणाऱ्या रतन टाटा यांचे प्रेरणादायी विचार सदैव स्मरणात राहतील. रतन टाटा यांचे हे प्रेरणादायी विचार कोणत्याही व्यक्तीला जीवनातील वास्तविक वास्तवाची ओळख करून देणार नाहीत तर जीवन कसे जगायचे हे देखील शिकवतील.

“जर तुम्हाला वेगाने जायचे असेल तर एकटे जा
पण तुम्हाला खूप दूर जायचे असेल सोबतीने जा” – रतन टाटा

Ratan Tata Love Story | प्रेम केलं पण…

रतन टाटा यांचे लग्न झाले नव्हते, त्यांचीही एक प्रेमकहाणी होती, पण अधुरीच…. लॉस एंजेलिसमध्ये एका कंपनीत काम करत असताना रतन टाटा एका मुलीच्या प्रेमात पडले..ते त्या मुलीशी लग्न करणार त्याआधीच त्यांच्या आजीची तब्येत बरी नसल्याने त्यांना भारतात परतावे लागले. रतन टाटा यांना वाटलं की त्यांना प्रिय असलेली व्यक्ती त्यांच्यासोबत भारतात येईल. रतन टाटांनी सांगीतलं की, ‘1962 च्या भारत-चीन युद्धामुळे त्यांच्या घरचे त्या मुलीला भारतात घेण्याच्या बाजूने नव्हते आणि त्यामुळे त्यांचं नातं तुटलं….’