Verification: 4e7838d05962b884

Allu Arjun Released From Jail | झुकेगा नहीं साला! फायर नहीं वाईल्ड फायर है | Pushpa 2

Spread the love
New Project 1 1

Allu Arjun Released From Jail | झुकेगा नहीं साला.. फायर नहीं वाईल्ड फायर हू मै.. या पुष्पा फिल्म मधील डायलॉगमुळे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्या गाजविणारा अभिनेता अल्लू अर्जुन चांगलाच चर्चेत आलाय.. Pushpa 2 Film सुपर डुपर हिट ठरली पण पण हैदराबादमधील एका घटनेने त्याला गालबोट लागला. त्याचं झालं असं की संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेला प्राण गमवावे लागले. त्यामुळं अभिनेता अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली. पाच तास हा ड्रामा सुरू होता. अखेर जामिनावर अल्लू अर्जूनची सुटका करण्यात आलीए. त्याला नामपल्ली न्यायालयाने 14 दिवसांची कोठडी सुनावली होती. उच्च न्यायालयात अपिल केल्यानंतर पुष्पा’ला अखेर दिलासा मिळालाय.

अल्लू अर्जुन अभिनेता आहे. त्याला त्याच्या हक्कापासून वंचित ठेवता येणार नाही. नागरिक म्हणून त्यालाही जगण्याचा अधिकार आहे. असं वकिलांनी युक्तिवादात सांगीतलं. ‘अल्लू अर्जुन तिथे आला त्यामुळं कोणाचा जीव गेला असं पोलिसांच्या पाहण्यात आले नव्हते. बरेच कलाकार सिनेमा रिलीजआधी प्रीमियरला हजेरी लावतात. तेच अल्लू अर्जूनने केलं होतं.

अल्लू अर्जूनची यात काही चुक नव्हती खटाला मागे घेण्यास आपण तयार असल्याचे प्राण गमावलेल्या महिलेचा पती भास्करने सांगीतले. या संपुर्ण प्रकरणातत पुष्पा फेम अभिनेत्री Rashmika Mandana हिने प्रतिक्रिया दिलीए, रश्मिका म्हणाले जे काही घडत आहे यावर माझा विश्वास बसत नाही. सगळ्या प्रकरणासाठी एकाच व्यक्तीला दोषी धरणे योग्य नसुन हे अविश्वसनीय असल्याचं तिनं म्हंटलंय…

तर बेडरुममध्ये येवुन पोलीसांनी अल्लू अर्जूनला अटक केली त्यामुळं अल्लू अर्जूनने नाराजी व्यक्त केलीए. जामिन मिळूनही अल्लू अर्जूनला एक रात्र तुरुंगातचं काढावी लागली शनिवारी सकाळी त्याची सुटका झाली…कारण जामिनाची प्रत शनिवारी सकाळी अल्लू अर्जूनच्या हाती पडली. रात्री मात्र अल्लू अर्जून थोडासा अस्वस्थ वाटतं होता. तुरुंगाच्या रुल नुसार त्याला रात्रीचे जेवण दिले. झोपण्यासाठी त्याला बेड आणि उशी.. पण तरीही तो अस्वस्थच होता..या कुशीवरुन त्या कुशीवर कशी बशी त्याने रात्र घालवली. सुटकेची तो वाट पहात होता, तुरुंगाबाहेर त्याचे चाहते पुष्पा कधी बाहेर येतोय याची वाटचं पाहत होते.जेलची वारी अल्लू अर्जूनच्या आयुष्यातील काळरात्रचं ठरली. अखेर त्याची जामिनावर सुटका झालीच..

तुरुंगातुन बाहेर येताच त्याने चाहत्यांचे आभार मानले. काळजी करण्यासारखं काहीही नसुन. मी सुरक्षित आहे, मी कायद्याचं पालन करणारा आहे. मला कायद्याबद्दल आदर आहे. पोलिस तपासात मी पूर्णपणे सहकार्य करेन. जी घटना घडली त्याचा मला खेद आहे. मृत महिलेच्या कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी असल्याचं अल्लू अर्जुन यानं म्हंटलंय.