Verification: 4e7838d05962b884

ATM withdrawals EPF | PFO 3.0 पीएफचे पैसे काढता येणार ATM मधुन

Spread the love
New Project 2

ATM withdrawals EPF | केंद्रसरकारने नुकतेच PAN 2.0 ची घोषणा केलीए…त्यानंतर आता PFO 3.0 ची घोषणा होण्याची शक्यता आहे. काय असणार आहे या PFO 3.0 मध्ये चला तर पाहूया…

भविष्य निर्वाह निधी म्हणजे EPFO मध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. पीएफ खात्यात गुंतवणूक वाढवण्यासाठी व्याजदर जादा ठेवण्याचे धोरणही अवलंबले जाऊ शकते. इतकेच नाही तर कंपन्यांचा EPFO मधील वाटा वाढवण्यासाठी उपाय करण्यात येऊ शकतात. त्यामुळं कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेळी मोठी रक्कम मिळू शकते. एवढचं नाही तर ग्राहकांना थेट एटीएममधून त्यांच्या पीएफची रक्कम काढता यावी यासाठी प्रयत्न सुरूआहेत. तुमच्या बँकेचे ATM कार्ड नसेल तर पीएफ खात्याकडून कर्मचाऱ्यांना हे एटीएम कार्ड देण्यात येईल. ATM व्दारे कुठल्याही एटीएममधुन पैसे काढता येतील. त्याचबरोबर कर्मचाऱ्याला त्याच्या सोईनुसार खात्यात बचतीचा पर्याय देण्यात येईल. त्यामुळे कर्मचारी पगाराच्या कितीही टक्के रक्कम PF खात्यात जमा करू शकतो. पण पगाराएवढी रक्कम त्याला जमा करता येणार नाही.

PF संदर्भात ही अपडेट कशी वाटली कमेंट करुन सांगा अशाच अपडेटसाठी पाहत रहा Rajenews