Verification: 4e7838d05962b884

CBI Raid : दोन खासदारांच्या घरावर सीबीआयचे छापे

Spread the love
CBI raids residence of two RJD MPs in Bihar
CBI Action

CBI Raid : केंद्रीय तपास यंत्रणा-सीबीआयने आज बिहारमधील राष्ट्रीय जनता दलाचे खासदार फय्याज अहमद ( MP Fayyaz Ahmed ) आणि अश्फाक करीम ( Ashfaq Karim ) यांच्या घरांवर छापे टाकले. सीबीआयने राष्ट्रीय जनता दलाचे विधान परिषदेचे सदस्य सुनील कुमार सिंग आणि याच पक्षाचे विधान परिषदेचे माजी सदस्य सुबोध राय आणि अबू दोजना यांच्या घरांचीही झडती घेतली.

फय्याज अहमद यांच्या मधुबनी येथील निवासस्थानी आणि अशफाक करीम यांच्या पाटणा आणि कटिहार येथील घरांवर छापे टाकण्यात आले. माजी मुख्यमंत्री राबडी देवी ( Rabri Devi ) यांचे खाजगी सचिव नागमणी यांच्या निवासस्थानाचीही सीबीआयने झडती घेतली. सूत्रांनी सांगितले की, छाप्यांदरम्यान तपास यंत्रणेने जमिनीच्या बदल्यात नोकरी देण्याच्या घोटाळ्याशी संबंधित कागदपत्रे जप्त केली आहेत.

जमिनीच्या बदल्यात नोकरी दिल्याप्रकरणी हा छापा टाकण्यात आला आहे. सीबीआयने माजी रेल्वे मंत्री लालू प्रसाद ( Lalu Prasad ) आणि त्यांच्या पत्नी आणि माजी मुख्यमंत्री राबडी देवी आणि त्यांच्या कुटुंबीयांवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे.

Join Whatsapp for Daily Updates

https://chat.whatsapp.com/DbUd8DoK4SjK2Jwss1yMxZ