Verification: 4e7838d05962b884

अलफिया पठाण आणि गितीकाला सुवर्ण पदक

Spread the love

कझाकस्तानची राजधानी नूर सुलतान इथं एलोर्डा चषक मुष्टीयुध्द स्पर्धा सुरू आहे. यामध्ये भारताच्या अलफिया पठाण ( Alfia Pathan )आणि गितीका ( Gitika ) यांनी सुवर्णपदक पटकावले आहे. तसेच कलैवाणी श्रीनिवासन आणि जमुना बोरो यांनी रौप्य पदकाची कमाई केली आहे.

81 KG वजनी गटाच्या अंतिम सामन्यांत अलफिया हिने 2016 ची विश्वविजेती कझाकस्तानची लज्जत कुंगेबायवा हिच्यावर 5-0 अशी मात केली आहे. त्याचबरोबर 48 KG गटात झालेल्या लढतीत गितीकाने कलैवाणी श्रीनिवासन हिचा 4-1 असा पराभव केला. तर 54 किलो वजनी गटांत जमुना बोरोनं उझबेकिस्तानच्या निगिना उक्तोमोवाकडून 5-0 अशी हार पत्करावी लागली.

भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेत 2 सुवर्ण, 2 रौप्य आणि 10 कास्य पदकांसह 14 पदक पटकाविले आहेत.

Red White Modern Tutorial Youtube Thumbnail 7
अलफिया पठाण ( Alfia Pathan )आणि गितीका ( Gitika ) यांनी सुवर्णपदक