Verification: 4e7838d05962b884

सरकारी योजनांसाठीच्या ( Gov Scheme ) जन समर्थ वेबसाइटचं प्रधानमंत्र्यांकडून लोकार्पण

Spread the love

पीएम नरेंद्र मोदी यांनी योजनांसाठीच्या ‘जन समर्थ’ ( Jan Samarth ) वेबसाइटचं आज अनावरण केलं. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून विशेष सप्ताहाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यामुळे लाभार्थ्यांना कर्जदात्यांशी थेट संपर्क साधता येणे शक्य होणार आहे. शिवाय सोप्या आणि डिजिटल ( Digital )प्रक्रियेद्वारे योग्य सरकारी योजनेंचे लाभ नागरिकांना घेता येणार आहेत. याद्वारे विद्यार्थी, शेतकरी, व्यावसायिक, लघुउद्योजकांची स्वप्नपूर्ती होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १, २, ५, १० आणि २० रुपयांच्या नव्या नाण्यांचे अनावरण प्रधानमंत्र्यांनी केले आहे. मागील 8 वर्षांत देशाने दर दिवशी एक नवं पाऊल उचलले आहे. त्यावचबरोबर नवीन काम करण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले आहे.

NPIC 202266212345
Jan Samarth