Verification: 4e7838d05962b884

भालाफेकपटू ( Javelin thrower ) नीरज चोप्राने ( Neeraj Chopra ) स्वतःचाच विक्रम मोडला

Spread the love

फिनलंडमध्ये सुरू असलेल्या पाव्हो नुर्मी क्रीडा स्पर्धेत टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू ( Javelin thrower ) नीरज चोप्रानं ( Neeraj Chopra ) स्वतःचाच विक्रम मोडीत काढला. याआधीचा त्याचा विक्रम ८८ पूर्णांक ०७ शतांश मीटरचा होता. यावेळी नीरजने ८९ पूर्णांक ३० मीटर अंतरावर भाला फेकला. यासोबतच या स्पर्धेतलं रौप्यपदकही त्याने पटकावलं.

फिनलंडच्या ऑलिव्हर हेलँडरने ८९ पूर्णांक ८३ मीटर भालाफेक करत सुवर्णपदक पटकावलं. युवा कल्याण आणि क्रीडामंत्री अनुराग ठाकूर ( Anurag Thakur )यांनी या नव्या विक्रमाबद्दल नीरज चोप्राचं अभिनंदन केलं आहे.

भालाफेकपटू ( Javelin thrower ) नीरज चोप्राने ( Neeraj Chopra ) स्वतःचाच विक्रम मोडला