Verification: 4e7838d05962b884

Kerala Landslide Wayanad | केरळात वायनाडमध्ये भूस्खलन, ढिगाऱ्याखाली राज्यात दोन चार गावे गडप 93 ठार

Spread the love
New Project 4

Kerala Landslide Wayanad | केरळच्या वायनाड जिल्ह्यावर मंगळवारी निसर्गाने कहरचं केला. मुंडक्कई, चूरलमाला, अट्टामाला आणि नूलपुझा ही चार गावे भूस्खलनात मातीमोल झाली. यात आतापर्यंत जवळपात 100 लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेलेत. त्यामुळे बळींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. PM Modi यांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला.

बचाव कार्यात लष्कर, वायुदलाचे जवान तैनात करण्यात आलेत. पंतप्रधान मोदींकडून मदतीचे आश्वासन देण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली. रात्री 2 ते 6 च्या दरम्यान एकामागे एक तीन घटना घडल्या. डोंगरावरून दगड-मातीचे लोंढे वाहत आले यात संपूर्ण गावेचं गडप झाली.

गाढ झोपेत असताना काळाने घाला घातला. बेसावध लोकं ढीगार्याखाली गाढली गेली. बचाव कार्यासाठी SDRF, NDRF, ARMY आणि AIRFORCE बचावकार्य करत आहेत. मुसळधार पावसामुळे या बचाव कार्यात अडथळा येत आहे. जवळपास 93 लोकांचे मृतदेह हाती लागले आहेत.