Verification: 4e7838d05962b884

Madha Vidhan Sabha Election | माढ्याचं तिकीट कोणाच्या खिशात?

Spread the love

Madha Vidhan Sabha Election | राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहतायत. कोणता झेंडा घेऊ हाती? अशीच काही अवस्था उमेदवारांची झाल्याचं दिसुन येतंय. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कमळ सोडून तुतारी हाती घेतलेल्या मोहितेंनी विजय खेचून आणला होता. विधानसभा निवडणुकीसाठी Sharad Pawar यांनी माढ्यात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. पण कोणत्या नेत्याला माढ्यात उमेदवारी मिळणार हे अजून गुलदस्त्यातचं आहे.

New Project 29

पण आता माढ्यात विधानसभेच्या निवडणुकीत मोहितेंच्या घरीतील एका नावाची चर्चा आहे. त्यामुळं फिरसे मोहीते असंच काहीसं चित्र दिसण्याची शक्यता आहे.कारण माढा विधानसभा लढवण्याच्या तयारीत Vijaysinh Mohite Patil यांचे पुतणे Shivtejsinh Mohite Patil असल्याची चर्चा आहे. त्यांनी तशी इच्छाही व्यक्त केली होती. पण ते मुलाखतीला गैरहजर होते.

Ajit Pawar पक्षाचे आमदार Baban Dada Shinde यांचे सुपुत्र रणजीत शिंदे यांनी Jayant Patil यांची भेट घेतली. रणजीत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधानसभेसाठी रिंगणात उतरण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. पण माढ्याचं तिकीट कोणाच्या खिशात पडणार हे पाहण महत्वाचं ठरणार आहे. कारण शरद पवार कधी गुगली टाकतील याचा अंदाज नाही.