Verification: 4e7838d05962b884

Miss world 2021 | मिस वर्ल्ड 2021

Spread the love

पोलंडची कॅरोलिना बिलेव्स्का (karolina bielawska) प्यूर्टो रिकोमध्ये झालेल्या मिस वर्ल्ड स्पर्धेचे ७० वे विजेतेपद जिंकले

पोलंडची कॅरोलिना बिलेव्स्का (karolina bielawska) प्यूर्टो रिकोमध्ये झालेल्या मिस वर्ल्ड स्पर्धेचे ७० वे विजेतेपद जिंकले
Miss world 2021 | मिस वर्ल्ड 2021

कॅरोलिना मिस वर्ल्ड २०२१ ची विजेती बनली आहे. पोर्तो रिकोच्या सॅन जुआन येथील कोका-कोला म्युझिक हॉलमध्ये कोरोनेशन स्पर्धा पार पडली. या स्पर्धेची विजेती कॅरोलिना बिलेव्स्का झाली, तर प्रथम उपविजेती (First runner-up) अमेरिकेची श्री सैनी (shree saini miss world america) ही ठरली आणिद्वितीय उपविजेती (Second runner-up) कोट डी आयव्होर येथील ऑलिव्हिया येस (Olivia Yace from Cote D’Ivoire) झाली.

17 मार्च रोजी, जमैकाच्या टोनी-एन सिंग (Toni Ann Singh of Jamaica) हिने कॅरोलिना बिलेव्स्काला मिस वर्ल्ड 2021 चा ताज परिधान केला. भारताच्या मानसा वाराणसीने देखील मिस वर्ल्ड स्पर्धेत भाग घेतला, ज्यामध्ये टॉप 13 स्पर्धकांच्या शर्यतीमध्ये सहभागी झाली होती परंतु विजेत्यांच्या यादीत ती टॉप 6 मध्ये आपले स्थान मिळवू शकली नाही.

मिस वर्ल्ड संस्थेनुसार, कॅरोलिना सध्या मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर पदवीचे Managemnet Master Degree) शिक्षण घेत असून तिला पीएचडी (PHD) करायची आहे. कॅरोलिना एक मॉडेल म्हणून देखील काम करते, तिला तिच्या आयुष्यात एक मोटिव्हेशनल स्पीकर ( Motivational speaker) बनण्याची आशा आहे. तिला पोहणे आणि स्कूबा डायव्हिंग तसेच टेनिस आणि बॅडमिंटन खेळणे आवडते.

मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनने नुकतीच त्यांच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे की, कॅरोलिना सामाजिक कार्यक्रमांसाठी काम करत आहात. त्याच्या प्रकल्पाचे नाव Zupa na pietrini आहे. ज्यामाध्यमातून ती ते बेघर लोकांना मदत करते आणि लोकांना त्याबाबत जागरूक करते. ही संस्था समाजातील वाईट गोष्टीसोबत लढा देत आहे.

पोलंडमधील लॉड्झ शहरातील गरजूंना अन्न, कपडे आणि अत्यावश्यक सेवा पोहोचवणे हा त्यांच्या उपक्रमाचा उद्देश आहे.

पोस्टाचे डिजिटल बैंकिंग | Post digital banking
!!..Click hear to join..!!