Verification: 4e7838d05962b884

Ravichandran Ashwin | 13 वर्षांची कारकीर्द, 500 हून अधिक विकेट आणि आता 100 व्या कसोटीची वाट पाहतोय…

Spread the love
Ravichandran Ashwin | 13 वर्षांची कारकीर्द, 500 हून अधिक विकेट आणि आता 100 व्या कसोटीची वाट पाहतोय…

Ravichandran Ashwin | 13 वर्षांची कारकीर्द, 500 हून अधिक विकेट आणि आता 100 व्या कसोटीची वाट पाहतोय… भारताचा स्टार ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन त्याच्या कारकिर्दीतील महत्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. 7 मार्चपासून धरमशाला येथे इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील 5व्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याद्वारे अश्विन आपल्या कारकिर्दीतील 100 कसोटी पूर्ण करेल.

Ravichandran Ashwin’s brilliant turning point : ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विनने टर्निंग पॉइंटची आठवण करून दिली आहे. अश्विनने 2011 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये Cricket पदार्पण केले होते. तो म्हणाला की इंग्लंडविरुद्धची England 2012 ची मालिका त्याच्या कारकिर्दीचा टर्निंग पॉईंट होती. ज्यामुळे त्याला त्याच्या चुका सुधारण्यास मदत झाली. अश्विनने इंग्लंडविरुद्धच्या 4 कसोटी सामन्यांच्या Test Match मालिकेत 14 बळी घेतले होते.

माझ्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम स्पेल 2018-19 मध्ये बर्मिंगहॅममध्ये झाले असल्याचे म्हंटले. अलीकडेच, 500 कसोटी बळी पूर्ण करणारा अनिल कुंबळेनंतर Anil Kumble तो दुसरा भारतीय गोलंदाज ठरला.

100 कसोटी सामने खेळणारा अश्विन हा 14वा भारतीय क्रिकेटपटू ठरणार आहे. याआधी चेतेश्वर पुजाराने Cheteshwar Pujara गेल्या वर्षी दिल्लीत भारतासाठी 100 वी कसोटी खेळली होती. अश्विनने आतापर्यंत 99 कसोटी सामन्यांमध्ये 23.91 च्या सरासरीने 507 बळी घेतले आहेत. 500 पेक्षा जास्त कसोटी बळी घेणारा अश्विन हा दुसरा भारतीय आहे.