Verification: 4e7838d05962b884

FASTag मध्ये रिचार्ज करण्याच्या झंजटपासुन सुटका ; RBI चा नवा नियम…

Spread the love
The Reserve Bank of India (RBI) has taken a big step to include Fastag and National Common Mobility Card (NCMC) in the e-mandate framework

FASTag | आता फास्टॅग वापरकर्त्यांना फास्टॅग पुन्हा पुन्हा रिचार्ज करण्याची गरज भासणार नाही. कारण कस्टमरच्या अकाउंटमधून पैसे कट होतील.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ( RBI ) सर्व बँकांसाठी एक नवीन नियम आणला आहे, ज्या अंतर्गत ते FASTag आणि नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) सारख्या काही सेवांच्या संबंधी अधिसूचना जारी काल्या आहेत.

या पेमेंट सिस्टममध्ये, रक्कम निश्चित मर्यादेपेक्षा कमी होताच, पैसे ग्राहकाच्या खात्यातून आपोआप कट होतील, म्हणजेच आता फास्टॅग वापरकर्त्यांना फास्टॅग पुन्हा पुन्हा Recharge करण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे ग्राहकांना फास्टॅग रिचार्ज करण्याच्या त्रासापासुन सुटका मिळणार आहे.

यामुळे फास्टॅग आणि NCMC वापरकर्त्यांना वारंवार रिचार्ज करण्याची गरज नाही. त्यांना प्रवास करताना टोलवर थांबण्याची गरज नाही. फास्टॅगचे रिचार्ज संपल्यानंतर वाहन टोल प्लाझावर पोहोचल्यावर विनाकारण गोंधळ झाल्याचे अनेकदा दिसून आले आहे. या नवीन प्रणालीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे, कारण त्यांची आता मॅन्युअल रिचार्जच्या त्रासातून सुटका होणार आहे.

The Reserve Bank of India (RBI) has taken a big step to include Fastag and National Common Mobility Card (NCMC) in the e-mandate framework