Verification: 4e7838d05962b884

39 Runs in an Over | एका षटकात ३९ धावा! टी-२० मध्ये नवा विक्रम | Yuvraj Singh Record

Spread the love

T-20 International Cricket मध्ये एका षटकात सर्वाधिक धावा करण्याचा नवा विश्वविक्रम रचला आहे. T-20 World Cup Qualifier फेरीतील सामोआ आणि वानुआतू यांच्यातील सामन्यादरम्यान हा विक्रम केला गेला.

सामोआचा फलंदाज डॅरियस व्हिसरने मंगळवारी टी-२० विश्वचषक पात्रता सामन्यात वानुआतुचा गोलंदाज नलिन निपिकोच्या षटकात ६ चेंडूत ६ षटकार ठोकले. या ओव्हरमध्ये 3 नो बॉलचाही समावेश होता. यासह T-20 आंतरराष्ट्रीय सामन्यातील एका षटकात सर्वाधिक धावा करण्याचा 39 धावांचा विक्रम रचला.

यापूर्वीचा विक्रम 36 धावांचा होता. भारताचा युवराज सिंग, वेस्ट इंडिजचा केरॉन पोलार्ड आणि निकोलस पूरन आणि नेपाळचा दीपेंद्र एरी यांनी एका षटकात 6 षटकारांसह 36 धावा करण्याचा पराक्रम केला आहे. एक फलंदाज म्हणून, डॅरियस व्हिसरने एका षटकात सर्वाधिक धावा करण्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे, परंतु 3 नो-बॉलमुळे, त्याने आंतरराष्ट्रीय T20 मध्ये एकाच षटकात सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम रचला आहे.

व्हिसरच्या आधी 3 फलंदाजांनी 6 चेंडूत 6 षटकार ठोकले होते.
T-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात एका षटकात 6 षटकार मारणारा व्हिसर हा चौथा फलंदाज आहे. त्याच्या आधी भारताचा युवराज सिंग, वेस्ट इंडिजचा किरॉन पोलार्ड आणि नेपाळचा दीपेंद्र सिंग ऐरी यांनी एका षटकात 6 षटकार ठोकले आहेत. सर्वप्रथम yuvraj Singh ने 2007 T-20 Worldcup इंग्लंडच्या Stuard Broad विरुद्ध 6 चेंडूत 6 षटकार ठोकले होते.

दुसरीकडे, नलिन निपिको एका षटकात 36 किंवा त्याहून अधिक धावा देणारा सहावा गोलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी स्टुअर्ट ब्रॉड (2007), अकिला धनंजय (2021), करीम जनात (2024), कामरान खान (2024) आणि अजमतुल्ला ओमरझाई (2024) यांनी षटकात 36 धावा दिल्या आहेत.