Verification: 4e7838d05962b884

September 9: World EV Day | जागतिक EV दिवस

Spread the love

ई-मोबिलिटीचा उत्सव साजरा करण्यासाठी दरवर्षी 9 सप्टेंबर रोजी जागतिक EV दिवस साजरा केला जातो

Electric Veicales

ई-मोबिलिटीच्या निमित्ताने, जगभरात विशेष जागरूकता मोहिमा आयोजित केल्या जातात, ज्यामुळे लोकांना इलेक्ट्रिक वाहनांच्या फायद्यांविषयी शिक्षित केले जाऊ शकते. ही एक सोशल मीडिया मोहीम आहे, जी चालकांना इलेक्ट्रिक वाहनांचे फायदे ओळखण्यास प्रोत्साहित करते. या मोहिमेव्दारे चालकांना प्रोत्साहन दिले जाते, की ते जी कार चालवितील, ती पारंपारिक इंधन कार नसून इलेक्ट्रिक असेल.

EV Summit –

EV समिट जगभरातील ई-मोबिलिटी नेत्यांना एकत्र आणते. ज्याव्दारे विद्युतीकरण आणि शाश्वत वाहतुकीला कशा पध्दतीने विकसित करायचे हे सोगीतले जाते.

जागतिक EV दिवसाचा इतिहास –

ग्रीन.टीव्ही या टिकाऊ मीडिया कंपनीने जागतिक ईव्ही दिन उपक्रम तयार केला. तर जागतिक EV दिवसाची पहिली आवृत्ती 2020 मध्ये साजरी करण्यात आली.

जगातील सर्वात मोठी EV बाजारपेठ –

चीन ही जगातील सर्वात मोठी EV बाजारपेठ आहे. चीन व्यतिरिक्त, भारत ऑटोमोटिव्ह कंपन्यांसाठी पुढील पसंतीचे ठिकाण म्हणून उदयास येत आहे. भारत सरकारने इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला पुढे नेण्यासाठी सर्वती मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. सध्या, भारताचा ऑटोमोटिव्ह उद्योग जगातील पाचवा सर्वात मोठा उद्योग आहे. तो 2030 पर्यंत तिसरा सर्वात मोठा उद्योग बनणार आहे.

ईव्हीच्या दिशेने जाण्याचे भारताचे प्रयत्न –

भारत आधीच इलेक्ट्रिक वाहनांकडे वळण्यासाठी प्रयत्नशील आहे. काही दिवसांपुर्वीच ‘टेस्ला’ या आघाडीच्या इलेक्ट्रिक वाहन आणि ऊर्जा कंपनीने भारतात प्रवेशाची घोषणा केली. दरम्यान, टेस्ला कंपनीने बेंगळुरूमध्ये “टेस्ला इंडिया मोटर्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड”ची उपकंपनी आधीच समाविष्ट केली आहे. तसेच जपानस्थित सुझुकीने भारतात आपली पहिली EV लाँच करण्याची घोषणा केली, तर टाटा मोटर्सने 2025 पर्यंत 10 इलेक्ट्रिक कार बाजारात आणण्याची योजना आखली.

जागतिक EV दिवस म्हणजे काय ?

ई-मोबिलिटीच्या निमित्ताने, जगभरात विशेष जागरूकता मोहिमा आयोजित केल्या जातात, ज्यामुळे लोकांना इलेक्ट्रिक वाहनांच्या फायद्यांविषयी शिक्षित केले जाऊ शकते. ही एक सोशल मीडिया मोहीम आहे, जी चालकांना इलेक्ट्रिक वाहनांचे फायदे ओळखण्यास प्रोत्साहित करते.

जगातील सर्वात मोठी EV बाजारपेठ कोणती ?

चीन ही जगातील सर्वात मोठी EV बाजारपेठ आहे. चीन व्यतिरिक्त, भारत ऑटोमोटिव्ह कंपन्यांसाठी पुढील पसंतीचे ठिकाण म्हणून उदयास येत आहे.

More News –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *