Verification: 4e7838d05962b884

Shivsena : धनुष्यबाण हे चिन्ह कुणाला मिळणार ?

Spread the love

Shivsena : शिंदे गटाने धनुष्यबाण या चिन्हावर आपला दावा केला आहे. निवडणूक आयोगाने तातडीने आदेश द्यावा, अशी मागणी शिंदे गटाने केली आहे. यासंबंधीचे प्रतिज्ञापत्र आयोगाला सादर केल्याची माहिती मिळाली आहे.

Shinde vs Thackeray 1
Shivsena Uddhav Thackeray Eknath Shinde

अंधेरी पोटनिवडणुकीची अर्ज दाखल करण्याची तारीख 14 ऑक्टोबर आहे. त्याआधी हा निकाल लागणार का ? किंवा सुनावणी पुढे गेल्यास पर्याय काय होणार ? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत ?

चिन्ह कोणाला मिळणार याचा निर्णय होण्याची शक्यता कमी आहे. पक्षांमध्ये उभी फूट झाली आहे की नाही हे ठरवून निवडणूक आयोगाला निकाल द्यायचा आहे. पक्षाच्या वेगवेगळ्या स्तरांवर, कार्यकारणीत किती लोक आपल्या बाजूने आहेत याचे आकडे द्यावे लागणार. सोबत लोकांची शपथ पत्रं निवडणूक आयोगाला दिली जाणार आहेत.

विधिमंडळ पक्षासोबतच पक्षाच्या इतर शाखा आहेत याची माहिती आयोगाला द्यावी लागणार. दरम्यान, दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकल्यानंतर निवडणूक आयोग निर्णय घेण्याची शक्यता कमी आहे.

Join Whatsapp for Daily Updates

https://chat.whatsapp.com/DbUd8DoK4SjK2Jwss1yMxZ

What is Todays Update on Maharashtra Politics ?

Shivsena धनुष्यबाण हे चिन्ह कुणाला मिळणार याची सुनावणी होण्याची शक्यता

When is Andheri Pot Nivadnuk ?

अंधेरी पोटनिवडणुकीची अर्ज दाखल करण्याची तारीख 14 ऑक्टोबर