Verification: 4e7838d05962b884

“शिवस्वराज्य दिना” ( Shivswarajya Din )निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

Spread the love

राज्यात आज शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात येत आहे. रायगडावर ( Rayagad )६ जून १६७४ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्याभिषेक झाला. रयतेला, प्रजेला, बहुजनांना हे राज्य आपलं आहे, अशी विश्वासार्हता छत्रपती शिवाजी महाराजांनी ( Shivaji Maharaj )प्रत्येकाच्या मनात निर्माण केली.

 Shivswarajya Din 2022
Shivswarajya Din 2022

महाराष्ट्राचा ( Maharastra )हा समृद्ध वारसा असलेली लोककल्याणकारी राज्याची भूमिका आणि प्रेरणा राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला, पंचायत समितीला, जिल्हा परिषदेला घेता यावी, यासाठी राज्य शासनानं आजचा दिवस “शिवस्वराज्य दिन” ( Shivswarajya Din )म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या निमित्तानं राज्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद यांच्या ठिकाणी भगवा स्वराज्य ध्वज, शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारण्यात येणार असून, याबाबतची माहिती प्रत्येक ग्रामपंचायतींना पाठवण्यात आली आहे.