Verification: 4e7838d05962b884

Indian Stock Market Crash : ट्रम्प टॅरिफ व इतर कारणांमुळे 18% घसरण | August 2025

Spread the love

Indian Stock Market Crash | भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. ट्रम्प यांचं टॅरिफ ऑर्डर, FII विक्री, VIX वाढ आणि फार्मा इंडेक्समध्ये घसरण यांसारख्या कारणांनी बाजार कोसळला. जाणून घ्या संपूर्ण रिपोर्ट! भारतीय शेअर मार्केटमध्ये आज प्रचंड घसरण (stock market crash) पाहायला मिळाली. या कोसळण्यामागे फक्त Donald Trump यांच्या Tariff निर्णयाचा नाही, तर अनेक कारणांचा मिळून परिणाम आहे.

New Project 31 1

📉 Share Market मोठी घसरण –

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी, म्हणजे शुक्रवार (2 ऑगस्ट 2025) रोजी शेअर बाजारात जोरदार घसरण झाली.

Sensex 657 अंकांनी कोसळून 80,528.09 वर बंद झाला.

Nifty50 203 पॉइंट घसरून 24,565.35 वर बंद झाला.

Nifty Bank 344 अंकांनी घसरून 55,617 वर बंद झाला.

📉 BSE मध्ये घसरण –

BSE चे टॉप 30 स्टॉक्सपैकी 24 स्टॉक्स घसरले.

Sun Pharma च्या शेअरमध्ये सर्वात जास्त, म्हणजे 4.49% ची घसरण झाली.

Tata Steel, Tata Motors, Infosys आणि Maruti चे शेअर्स सुद्धा 3% पर्यंत कोसळले.

मात्र, Trent, Asian Paints आणि Reliance मध्ये थोडी वाढ पाहायला मिळाली.

📌 Share Market कोसळण्यामागची 5 प्रमुख कारणं –

ट्रम्प टॅरिफचा शॉक –

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह 70 देशांवर reciprocal tariff लागू करण्यासाठी एक Executive Order साइन केला आहे. यात भारतावर 25% टॅरिफ लावण्याची शक्यता आहे, जो 7 ऑगस्टपासून लागू होऊ शकतो. या बातमीने बाजारात भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि सेन्टिमेंट नकारात्मक झाले.

FII विक्रीत वाढ –

विदेशी गुंतवणूकदार म्हणजेच FII (Foreign Institutional Investors) हे सातत्याने शेअर्स विकत आहेत. गुरुवारी 5,588.91 कोटी रुपयांचे शेअर्स विकले, ज्यामुळे मार्केटमध्ये प्रभाव दिसून आला.

Asian Markets मध्ये sell-off –

South Korea, Japan, China आणि Hong Kong सारख्या प्रमुख एशियन मार्केट्समध्ये सुद्धा आज sell-off झाला, ज्याचा परिणाम भारतीय शेअर मार्केटवर झाला.

India VIX वाढला –

India VIX म्हणजेच मार्केटमधील volatility index, जो भीतीचं प्रमाण दर्शवतो, तो 2% नी वाढून 11.77 वर बंद झाला. याचा अर्थ बाजारात अनिश्चिततेचं वातावरण वाढलं आहे.

Pharma Sector चा फटका –

Nifty Pharma Index मध्ये आज 3% ची घसरण झाली. यामध्ये Sun Pharma चा मोठा वाटा असून त्यात 4.49% ची घसरण झाली.

📉 18% नी घसरलेले Top Share –

खालील स्टॉक्समध्ये सर्वात मोठी घसरण नोंदवली गेली:

PNB Housing Finance: 18% घट, शेअर 805 रुपयांवर बंद

IIFL Finance: 10% घट

RR Cable: 7.14% घट

CSK Pharma: 7.15% घट

Aurobindo Pharma: 6% घट

Indus Towers: 5% घट

Page Industries: 4% घट

Adani Power: 3.5% घट

Dr. Reddy’s Labs: 4% घट

Sonata Software: 7% घट

भारतीय शेअर मार्केटमधील घसरण ही एकाच घटकामुळे नाही, तर जिओ-पॉलिटिकल निर्णय, एफआयआय विक्री, आणि आंतरराष्ट्रीय मार्केट दबाव यांसारख्या अनेक कारणांमुळे झाली आहे. येत्या काही दिवसांत ट्रम्प टॅरिफ लागू होतो की नाही यावरही बाजाराचं पुढचं मूव्हमेंट अवलंबून असेल.