Verification: 4e7838d05962b884

पहिली खासगी रेल्वे शुक्रवारी कोईम्बतूर ते शिर्डी ( Coimbatore to Shirdi ) मार्गावर धावली

Spread the love

भारत गौरव या योजनेअंतर्गत पहिली खासगी रेल्वेगाडी काल कोईम्बतूर ते शिर्डी ( Coimbatore to Shirdi ) या मार्गावर धावली. या रेल्वेला साऊथ स्टार ( South Star ) असं नाव दिलं आहे.

दोन दिवसांच्या प्रवासानंतर सुमारे 820 साईभक्तांना घेऊन शिर्डीच्या साईनगर रेल्वे स्थानकावर दाखल झाली. दरम्यान, ही रेल्वे दर मंगळवारी कोईम्बतूर इथून निघून, गुरुवारी शिर्डीला पोहोचेल. तसेच शुक्रवारी शिर्डीतून निघून, रविवारी कोईम्बतूरला पोहचणार आहे. भारत गौरव योजनेअंतर्गत खासगी आणि पर्यटन कंपन्यांना रेल्वेकडून भाडेतत्वावर गाड्या दिल्या आहेत.

Coimbatore to Shirdi Railway
Coimbatore to Shirdi Railway