
UPSC Exam | केंद्र सरकारने केंद्रीय मंत्रालयांमध्ये खासगी क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची सहसचिव, संचालक, उपसचिव स्तरावरील 45 जागांवर होणारी थेट भरती रद्द करण्याची सूचना UPSC आयोगाला मंगळवारी केली. भाजपकडून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, OBC यांचा Reservation हक्क हिरावून घेत असल्याची टीका Congress कडून केली होती.
समाजातील उपेक्षित घटकांना सरकारी सेवेत योग्य प्रतिनिधित्व मिळायला हवे. थेट भरतीची जाहिरातही रद्द करण्यात आल्याचे Jitendra Singh यांनी सांगीतले. या भरतीसाठी UPSCने 17 ऑगस्ट रोजी अधिसूचना प्रसिद्ध केली होती.