Verification: 4e7838d05962b884

Donald Trump tariffs on India | ट्रम्पचा भारताला पुन्हा टॅरिफ झटका!

Spread the love
New Project 34

Donald Trump tariffs on India | माजी अमेरिकन अध्यक्ष Donald Trump यांनी पुन्हा एकदा भारताच्या दृष्टीने चिंताजनक पाऊल उचलण्याची घोषणा केली आहे.त्यांनी भारतावर आयात शुल्क Tariff वाढवण्याचा विचार पुन्हा मांडला आहे. पण ट्रम्प India बद्दल अशी पावलं का उचलत आहे, पाहुया सविस्तर.

नुकतच डोनाल्ड ट्रम्प यांनी एक पोस्ट केलीय. त्यामध्ये त्यांचा असा आरोप आहे की ते भारतावर आणखी टॅरिफ लावणार आहेत. भारत Russiaकडून केवळ तेल खरेदी करत नाही, तर खरेदी केलेले तेल भारत विक्री करत असल्याचं ट्रंम्प यांनी म्हंटलय. रशियामुळे यक्रेनचे अनेक लोक मृत्यूमुखी पडत आहेत. पण याची भारताला काळजी नसल्याचं ट्रम्प यांनी नमुद केलंय. भारत अनेक अमेरिकी वस्तूंवर जास्त शुल्क आकारतो आणि असंही त्यांनी आधिच सांगितले होते.

ट्रम्प यांच्या या भूमिकेमुळे India-U.S व्यापार संबंधांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेषतः स्टील, अॅल्युमिनियम, औषधं, आणि माहिती तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांना मोठा फटका बसू शकतो. भारतीय निर्यातदारांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे कारण अमेरिकन बाजारपेठेत स्पर्धा करणे अधिक कठीण होणार आहे.

या टॅरिफ वाढीमुळे दोन्ही देशांतील व्यापार तणाव वाढू शकतो. यामुळे भारताने WTO (World Trade Organization) कडे दाद मागण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुकीत ट्रम्प पुन्हा सत्तेवर आल्यास भारताला त्यांचा धोरणात्मक दृष्टीकोन अधिक महागात पडू शकतो.

आता PM Narendra Modi यासगळ्याला कसं उत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.