Verification: 4e7838d05962b884

US woman learns Marathi to surprise husband | मराठीची क्रेझ अमेरीकेत! मराठीसाठी काय पण | Virla Video

Spread the love

US woman learns Marathi to surprise husband | अमेरिकन पत्नीने पतीसाठी चक्क मराठी शिकलं. अमेरिकेतील कँडिस कर्णे Candace यांनी तिच्या भारतीय नवऱ्याशी स्नेहाने बोलण्यासाठी मराठी शिकण्याचा प्रयत्न केला आणि तो व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे. या Viral Videoमध्ये ती “शुभ सकाळ, कसा आहेस?” (Good morning, how are you?) अशी मराठीतून शुभेच्छा देते. तिचा नवरा अनिकेत कर्णे हा एकदम चकित होतो आणि त्याच्या चेहऱ्यावर आनंद आणि आश्चर्य स्पष्टपणे दिसतो.

New Project 21

त्यानंतर ती “नमस्कार” म्हणून “रात्री जेवायला काय आहे?” असा प्रश्न विचारते. अनिकेत उत्तर देतो की आज चिकन बनवले आहे, त्यावर ती आदराने “धन्यवाद” म्हणते आणि दोघांमध्ये हास्यकल्लोळ पहायला मिळतो.
.
या व्हिडीओला आतापर्यंत 1.7 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे.

“That smile when you were talking to him in his native language was like ‘This is why I love this woman.’’’ अशी प्रतिक्रिया एकाने दिली आहे.

यावेळी महाराष्ट्रात मराठी भाषेच्या वापराबाबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, कँडीसच्या या प्रयत्नांनी प्रेम व संस्कृतीचे सुंदर बंध अधोरेखित केले आहेत.