Verification: 4e7838d05962b884

Vidhanvhavan Jitendra Awhad Vs Gopichand Padalkar Controversy | विधानभवनाच्या लॉबीमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी | Marathi Political News

Spread the love
New Project 8 1

Vidhanvhavan Jitendra Awhad Vs Gopichand Padalkar Controversy | गोपिचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये आज फ्रीस्टाईल हाणामारी झाल्यांचं दिसुन आलं. त्यामुळं वातावरण चांगलचं तापलं आहे. विधिमंडळ अधिवेशन संपायला फक्त एकच दिवस राहिला असताना हे गालबोट लागलं आहे. पण या सगळ्याची सुरुवात कशी झाली घेऊया संपूर्ण आढावा.

त्याचं झालं असं की काल (Jitendra Awhad) यांनी विधानभवन परिसरात जाताना पडळकरांना मंगळसूत्रचोर असं म्हणत डिवचलं होतं. याचा व्हिडीओही व्हायरल झाला. त्यानंतर आज पडळकर गाडीतून उतरत असताना आव्हाड आणि पडळकर यांच्यात तू तू मैं मैं झाल्याचं दिसून आलं. कालचा वाद हा शिविगाळ करण्यापर्यंत पोहोचला होता. त्याचं झालं असं की गाडीतून उतरताना gopichand padalkar यांनी गाडीचा दरवाजा जोरात लावला. तेव्हा तिथे आव्हाड उभे होते. आव्हाडांनी गाडीचा दरवाजा लागला असं सांगितल्याचं बोलल जातयं. त्यामुळं दोघांच्यातही चकमक झाली.

आज आव्हाडांचे कार्यकर्ते आणि पडळकरांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याच पहायला मिळालं. जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना मारहाण झाली. पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश ठकले याने ही मारहाण केल्याचं समोर आलं.

दरम्यान पडळकरांच्या कार्यकर्त्याच्या हल्ल्यानंतर आव्हाड चांगलेच संतापले. आमदार सुरक्षीत नसतील कशाला राहायचं आमदार? अशा शब्दात त्यांनी आपला रोष व्यक्त केला. विधानसभेत गुंडांना प्रवेश देणार असाल तर कुणीच सुरक्षीत नाहीत. कुत्रा, डुक्कर, मारुन डाकू अशा धमक्या देण्यात आल्याचं आव्हाड म्हणाले. सत्तेचा माज आलाय. शिव्या देतो, त्याला ऑफिशियल लॅग्वेज म्हणून डिक्लेर करा असंही आव्हाडांनी सांगितलं.

दरम्यान या राड्यानंतर हे गुंड आत आले कसे? त्यांना पास दिला कुणी? बंदोबस्त असताना ते आत शिरले कसे? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. तर या घटनेची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी ठाकरेंनी केली.

दरम्यान, विधिमंडळातील सदस्यांच्या सुरक्षेची जबाबदारी माझी आहे. या प्रकरणासंबंधीचा अहवाल मागवला असून योग्यती कारवाई करणार असल्याचं अध्यक्ष राहूल नार्वेकर (Rahul Narvekr )यांनी सांगितलं.

हा प्रकार चुकीचा असून याला मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष जबाबदार असल्याची टीका नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे.

या सर्व प्रकारानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी माफी मागीतली आहे. विधिमंडळ परिसरात घडलेला प्रकार चूकीचा असल्याचं त्यांनी मान्य केलं आहे. आता या प्रकरणी राहूल नार्वेकर काय निर्णय देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.