Verification: 4e7838d05962b884

Nasa Artemis-1 चंद्र मोहिमेचे प्रक्षेपण का पुढे ढकलले ?

Spread the love

Nasa Artemis-1 : इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे नासाने आर्टेमिस-1 चंद्र मोहिमेचे प्रक्षेपण पुढे ढकलले आहे. यूएस स्पेस एजन्सी आज आपल्या पहिल्या चाचणी उड्डाणासाठी अत्याधुनिक रॉकेट आर्टेमिस ( Artemis-1 ) पाठवणार होती. अपोलोच्या ( Apolo ) शेवटच्या चंद्र मोहिमेच्या पन्नास वर्षांनंतर हे नियोजित सहा आठवड्यांचे चंद्रावर मानवरहित उड्डाण होते.

NPIC 20228292042
( Why Nasa postponed the launch of Artemis-1 lunar mission? )

प्रक्षेपणाच्या 40 मिनिटे आधी हे उड्डाण रद्द करण्यात आले आहे. ओरियन क्रू कॅप्सूल फ्लोरिडामधील केप कॅनवेरल येथील केनेडी स्पेस सेंटरमधून ( Kennedy Space Center ) हे उड्डाण होणार होते. ओरियनवरील सेन्सरला जोडून एक नर आणि दोन मादी पुतळे पाठवले जात होते. जेणेकरून अंतराळवीरांना पाठवण्यापूर्वी किरणोत्सर्गाची ( Radiation ) पातळी आणि इतर समस्या ओळखता येतील. केनेडी स्पेस सेंटरजवळील समुद्रकिनाऱ्यावर अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस ( US Vice President Kamala Harris ) यांच्यासह हजारो लोक प्रक्षेपण पाहण्यासाठी जमले होते. दरम्यान, नासाने ( Nasa ) प्रक्षेपणाची नवीन तारीख दिलेली नाही.

( Why Nasa postponed the launch of Artemis-1 lunar mission? )

Join Whatsapp for Daily Updates

https://chat.whatsapp.com/DbUd8DoK4SjK2Jwss1yMxZ