Verification: 4e7838d05962b884

T-20 World Cup : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाची घोषणा, जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल यांचे संघात पुनरागमन

Spread the love
T-20 World Cup
T-20 World Cup

T-20 World Cup : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( BCCI ) 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T-20 World Cup साठी भारताने पंधरा सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. कर्णधार म्हणून रोहित शर्मा, तर के. आले. राहुलला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. हर्षल पटेल ( Harshal Patel ) आणि जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumarah ) यांचे संघात पुनरागमन झाले आहे. दुखापतीमुळे रवींद्र जडेजा संघाबाहेर झाला असून त्याच्या जागी अक्षर पटेलला ( Akshar Patel ) संधी देण्यात आली आहे. विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल यांना संघात स्थान देण्यात आले आहे, तर मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई आणि दीपक चहर यांना अतिरिक्त खेळाडू म्हणून स्थान देण्यात आले आहे. भारताचा पहिला सामना 23 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. ( India vs Pakistan World Cup )

विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाचीही घोषणा करण्यात आली आहे.