Verification: 4e7838d05962b884

आयएनएस हंसा (INS Hansa)ने 5 सप्टेंबर 21 रोजी साजरा केला हिरक महोत्सव

Spread the love

5 सप्टेंबर 1961 रोजी आयएनएस हंसा (INS Hansa)कार्यान्वित

RajeNews_06_SEP_2021

दि. ०५ सप्टेंबर रोजी भारतीय नौदलाचा प्रमुख हवाई तळ आयएनएस हंसाने (INS Hansa)आपला हिरक महोत्सव साजरा केला आहे. सन 1958 मध्ये कोइम्बतूर येथे सी हॉक, अलिझ आणि व्हँपायर विमानांबरोबर उभारण्यात आलेल्या जेट फ्लाइटनंतर 5 सप्टेंबर 1961 रोजी आयएनएस हंसा (INS Hansa)कार्यान्वित झाले आहे. अशी माहिती PIB या वृत्त संस्थेने दिली आहे.

ins hansa
INS Hansa | आयएनएस हंसा

दरम्यान, गोवा मुक्तीनंतर, एप्रिल 1962 मध्ये दाबोळी हवाई क्षेत्र नौदलाकडुन ताब्यात घेण्यत आले. त्यानंतर जून 1964 मध्ये आयएनएस हंसा (INS Hansa) दाबोळीमध्ये स्थालांतरित करण्यात आले आहे.

आयएनएस हंसा (INS Hansa)सध्या 40 पेक्षा अधिक लष्करी विमानांचे संचालन करीत आहे, ज्यामध्ये वार्षिक सरासरी 5000 तासांहून अधिक उड्डाण करण्यात ते सक्षम आहे. तसेच देशामध्ये व आंतरराष्ट्रीय पातळीवरील उड्डाणे 24 X 7 पद्धतीने हाताळून हे हवाई तळ नागरी उड्डाणांना देखील पूरक ठरले आहे. आत्तापर्यंत एका वर्षात सरासरी 29000 उड्डाणे करण्यात आली आहेत.

INS हंसा तळावर डॉर्नियर -228 विमाने, आयएनएस 310 कोब्रा, आयएनएस 315 विंग्ज स्टॅलियन, आयएल – 38 एसडी, आयएनएस 339 फाल्कन्स, INAS 303 ब्लॅक पँथर्स, INAS 300 व्हाइट टायगर्स, सुपरसोनिक कॅरियर मधील मिग 29 के, ALH Mk III हेलिकॉप्टर, यांसह INAS 323 हॅरियर्स या भारतीय नौदलाच्या फ्रंटलाइन एअर स्क्वाड्रन आयएनएस हंसा येथे समाविष्ट करण्यात आले आहे. याचबरोबर हे हवाई तळ बोईंग P8I या लांब पल्ल्याच्या विमानासह आयएनएएएस 316 चे व्यवस्थापन करणार आहे.

आयएलएन हंसाचे कमांडिंग ऑफिसर सीएमडी अजय डी थिलोफिलस यांनी दिलेल्या माहितीनुसार, “मागील काही वर्षांपासून या तळाने नौदलाच्या महत्त्वपूर्ण विभागाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याचबरोबर हंसाचे विमान समुद्री किनारपट्टीसह संपूर्ण पश्चिमी समुद्र किनाऱ्याची सुरक्षा लक्षणीय रितीने वाढवित आहे. यासोबतच समुद्र आणि त्यातील धोक्यांना निष्प्रभ करण्यासाठी देखरेख ठेवत आहे. याशिवाय येथुन अधिकाऱ्यांना शोध आणि बचाव, एचडीआर, पूरातील सहकार्य, सामुदायिक उपक्रम करण्यात येत आहे. याचबरोबर ‘वंदे भारत’ विमान फेऱ्यांच्या रूपात भरीव मदत देखील प्रदान करण्यात आली आहे.

आयएनएस हंसा येथे 6 सप्टेंबर 2021 रोजी भारताच्या राष्ट्रपतींकडून नौदलाच्या परिचालन विभागाला ‘प्रेसिडेंट्स कलर’ सन्मान प्रदान करण्याच्या प्रतिष्ठित मानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा योग आयएनएस हंसाच्या हिरक महोत्सव आणि गोवा मुक्ती संग्राम यांच्याशी जुळून आला आहे.

join
www.RajeNews.com

More News –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *