Verification: 4e7838d05962b884

टोकियो पॅरालिंम्पिकमध्ये भारताने पाच सुवर्ण आणि आठ रौप्यसह 19 पदके जिंकली

Spread the love

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये,भारताने पाच सुवर्ण, आठ रौप्य आणि सहा कांस्य अशी 19 पदके मिळवत पदकतालिकेत 24 वे स्थान मिळविले

tokio pyaralom
टोकियो पॅरालिंम्पिक

आज दि. 05 रोजी टोकियो पॅरालिम्पिक समारोपाच्या दिवशी, भारतीय शटलर कृष्णा नगरने पुरुष एकेरी सामन्यात एसएच 6 प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे. त्याने हाँगकाँगच्या चू मानकाईचा 21-17, 16-21, 21-17 असा पराभव केला. त्याचबरोबर नोएडाचे जिल्हा दंडाधिकारी आणि पॅरा-बॅडमिंटन खेळाडू सुहास एल यथिराज यांनीही रौप्य पदक मिळवले आहे. तसेच पुरुष एकेरीच्या सामन्यात फ्रान्सच्या लुकास मजूरकडून त्याला पराभव पत्करावा लागला. हा सामना लुकास 15-21, 21-17, 21-15 ने जिंकला.

प्रमोद भगत आणि पलक कोहली मिश्र दुहेरीत कांस्यपदकाचा जिंकता आला नाही. त्याने जपानच्या डेसुके फुजीहारा आणि अकीको सुगिनो यांनी भारतीय जोडीला 21-23, 19-21 ने पराभूत केले. तसेच तिसऱ्या स्थानावर पोडियमवर स्थान मिळवले आहे. दरम्यान, देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी कृष्णा नगर आणि सुहास यथिराज यांना सुवर्ण आणि रौप्य पदके जिंकल्याबद्दल अभिनंदन केले आहे. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले, की, मजबूत आणि दृढनिश्चयी कृष्ण नगरने बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक जिंकून आपली क्षमता सिद्ध केली. तसेच “सुहास यथिराज यांनी जागतिक क्रमवारीत 1 ला कडवी झुंज दिली आणि बॅडमिंटनमध्ये रौप्य पदक जिंकले.” अशी प्रतिक्रीया राष्ट्रपतींनी दिली.

नेमबाज अवनी लेखारा आज टोकियो पॅरालिम्पिकच्या समारोप समारंभात भारताचा ध्वजवाहक असेल. लेखारा ही एकाच पॅरालिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. 19 वर्षीय खेळाडूने 10 मीटर एअर रायफलमध्ये सुवर्ण आणि 50 मीटर रायफल 3 स्थितीत कांस्य जिंकले आहे. भारतीय पॅरालिम्पिक क्रीडापटूंनी टोकियो क्रीडा स्पर्धेत पदकांसह समृद्धीने देशाचा गौरव केला आहे. भारताने तिरंदाजी, ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, पोहणे, वेटलिफ्टिंग यासह नऊ खेळांमध्ये भाग घेण्यासाठी 54 खेळाडूंना पाठवले होते.

More News –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *