Verification: 4e7838d05962b884

भारताला प्रमोद व मनोजने दिली दोन पदके

Spread the love

(Pramod Bhagat) बॅडमिंटनमध्ये सुवर्ण पदक जिंकले

pramod bhagat badmintan glold 1 3
Pramod Bhagat

तिसऱ्या स्थानाच्या प्ले-ऑफमध्ये मनोज सरकारने  (Manoj Sarkar) कांस्यपदक मिळवले. विद्यमान विश्वविजेत्या प्रमोद भगतने (Pramod Bhagat) शनिवारी पुरुष एकेरीच्या SL3 वर्गात ऐतिहासिक सुवर्णपदक पटकावले, तर मनोज सरकारने कांस्यपदक पटकावल्याने भारताने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये ऐतिहासिक पराक्रमावर शिक्कामोर्तब केला आहे.

भारताच्या प्रमोद भगतने लढतीमध्ये ग्रेट ब्रिटनच्या डॅनियल बेथेलला हरवले, तर सरकारने तिसऱ्या स्थानाच्या प्ले-ऑफमध्ये जपानच्या डेसुके फुजीहाराचा पराभव केला. या दोन्ही भारतीयांनी सरळ गेममध्ये विजय मिळवला आहे.

बॅडमिंटनमध्ये या वर्षी पॅरालिम्पिकमध्ये पदार्पण केल्यामुळे, भगत, सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय बनला आहे. योगी राष्ट्रीय स्टेडियमवर ४५ मिनिटे हा सामना रंगला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *