Verification: 4e7838d05962b884

भारतीय खेळाडू टोकियो पॅरालिम्पिकसाठी रवाना ; 54 खेळाडु भारताचे प्रतिनिधीत्व करणार

Spread the love

RajeNews_22_ऑगस्ट_2021

AVvXsEhe24zSj e6sFBEqxcOVulDbTHgDmOUDMEvrOrlkPakvzn6M9Wbsao YQdE6gYQ38UNPeV oIatx Ph2SuaW mhl6SAfRzApqzgR3LlNZNFYSUHfSBGZJ95Td3PVk5rocCdq4F22OMn5p3q9 118kYm3pE8CHm i1gecfJlMPp uMnZj3z5CQmHrDX=s320

नुकत्याच ऑलिंम्पीक स्पर्धेनंतर आता पॅराऑलिंम्पीकचे सामने टोकियो येथे रंगणार आहेत. त्यामुळे भारताची टीम देखील रवाना झाली आहे. यंदाच्या पॅराऑलिंम्पिंक सामन्याचा ध्वजवाहक थंगावेलू मरिअप्पन हा असुन, यामधील भारतीय खेळाडूंची पहिली तुकडी दि. 18 ऑगस्ट 2021 रोजी टोकियो पॅरालिम्पिकसाठी रवाना झाली आहे.

पॅरालिम्पिक खेळ 24 ऑगस्ट रोजी एका आठवड्याच्या कालावधीत सुरू होतील. रिओ पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता मरिअप्पन थंगावेलू सोबत डिस्कस थ्रोअर विनोद कुमार आणि पुरुष भाला फेकणारा टेक चंद यामध्ये सामिल आहेत. तरी या आठ सदस्यीय गटाला इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर क्रीडा मंत्रालय, भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) आणि भारतीय पॅरालिम्पिक समिती (PCI) च्या अधिकाऱ्यांनी निरोप दिला.

“सन्माननीय पंतप्रधान आणि क्रीडा मंत्री यांच्यासह संपूर्ण देश आज आमच्यासाठी आनंदित आहे. पॅरालिम्पिकमध्ये भाग घेणारा प्रत्येक खेळाडू आधीच विजेता आहे आणि मी त्या सर्वांना शुभेच्छा देतो,” असे पीसीआयच्या अध्यक्ष दीपा मलिक यांनी सांगितले. त्या पॅरालिम्पिक तुकडीशी संवाद सादत होत्या. पीसीआयच्या अध्यक्षांसह 14 सदस्यांची आणखी एक तुकडी बुधवारी संध्याकाळी जपानच्या राजधानीकडे रवाना होईल असे सांगण्यात आले आहे.

Table of Contents

2020 उन्हाळी पॅरालिम्पिकविषयी थोडक्यात –

2020 ग्रीष्मकालीन पॅरालिम्पिक टोकियो पॅरालिम्पिक खेळ म्हणून ओळखले जातात. ते आगामी प्रमुख आंतरराष्ट्रीय मल्टी-स्पोर्ट पॅरास्पोर्ट्स इव्हेंट आहेत. या खेळांचे व्यवस्थापन आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समिती करते. या वर्षी 16 व्या उन्हाळी पॅरालिम्पिक खेळ आयोजित केले जात आहे. दरम्यान, हे खेळ 24 ऑगस्टपासून टोकियोमध्ये आयोजित केले जातील आणि 5 सप्टेंबर 2021 रोजी संपतील. असे  वेळापत्रक ऑलिप्मिक आयोजकांकडुन सांगण्यात आले आहे.

कोरानामुळे पॅरालिम्पिक सामन्यांवर झालेला परिणाम –

पॅरालिम्पिक हे खेळ आधी 25 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2020 पर्यंत नियोजित होते. परंतु कोविड -19 महामारीमुळे ते पुढे ढकलण्यात आले. त्याचे आयोजन या सप्ताहापासुन होत आहे. या स्पर्धा भरत असलेले ठिकाण म्हणजे टोकियो येथील परिसरात आणीबाणीच्या स्थितीमुळे प्रेक्षकांना परवानगी देण्यात आलेली नाही

जपानमध्ये आयोजित तिसरे पॅरालिम्पिक –

सन 1964 च्या खेळांनंतर टोकियोमध्ये दुसऱ्यांदा या खेळांचे आयोजन करेण्यात आले आहे. तर एकूणच, जपानमध्ये आयोजित होणारे हे तिसरे पॅरालिम्पिक असणार आहे. कारण याआधी सन 1998 च्या हिवाळी पॅरालिम्पिकचे आयोजन जपान देशाने केले होते.

बॅडमिंटन आणि तायक्वांदो 2020 च्या खेळांमध्ये सादर होणार –

आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समिती (IPC) आयपीसी ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. ती पॅरालिम्पिक साठी एक प्रशासकीय संस्था आहे. ही संस्था पॅरालिम्पिक खेळाचे आयोजित करते. त्याचबरोबर एकुण नऊ खेळांसाठी आंतरराष्ट्रीय महासंघ म्हणून काम करते. आयपीसीची स्थापना 22 सप्टेंबर 1989 रोजी डसेलडोर्फ, पश्चिम जर्मनी येथे झाली. हे “पॅरालिम्पिक क्रीडापटूंना क्रीडा उत्कृष्टता प्राप्त करण्यासाठी आणि जगाला प्रेरणादायक आणि रोमांचक बनवण्याच्या” मिशनसाठी कार्य करते. याचे मुख्यालय बॉन, जर्मनी येथे आहे.

टोक्यो पॅरा-ऑलिम्पिक  स्पर्धेत 54 खेळाडु भारताचे प्रतिनिधीत्व करणार 

दि. 25 ऑगस्टपासून आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरु होणाऱ्या पॅरा-ऑलिम्पिकमध्ये भारताचे 54 क्रीडापटू भाग घेत आहेत. एकुण 9 क्रीडा प्रकारांमध्ये ते देशाचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. या स्पर्धेमध्ये तिरंदाजी, अ‍ॅथलेटीक्स (ट्रॅक आणि फील्ड), बॅडमिंटन, जलतरण, भारोत्तोलन खेळांचा समावेश असणार आहे. तरी यंदाच्यावर्षी पॅरा-ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारा, हा सर्वात मोठा चमू ठरला आहे. या सर्व सहभागी 54 क्रीडापटूंना टार्गेट ऑलिम्पिक पोडियम म्हणजे TOPS या योजनेतून प्रशिक्षण मिळाले आहे. अशी माहिती पी.आए.बी या वृत्तसंस्थेने दिली.

टेबल टेनिस पॅरा-ऑलिम्पिक 

AVvXsEgaE h8iG0ICbiQPKuf Af2s0x7rHopNeuFqoLKJgClVFBzDgeMMP8EeF UGMzjYg r8ekbSxdJtEATYYNh1sezRiXthAiQAO70uB P4wIh0EwnCLWaxnmB K5z2D8BKT8atPj9ESoSLuysGQYukecjNV2vQ3j a3KQMeZg tuxE1SeWjnzNI2fdUBp=w199 h200


भारताकडुन टेबल टेनिस या खेळ प्रकारात महिला एकेरीत आणि महिला दुहेरीत प्रतिनिधीत्व गुजरात येथील भाविना पटेल आणि सोनलबेन पटेल करणार आहेत. तरी या दोघींचीही पात्रता फेरी दि. 25 ऑगस्ट रोजी होणार आहे. शिवाय उपांत्यफेरी आणि अंतिम फेरीचे सामने 28 आणि 29 ऑगस्ट रोजी खेळवण्यात येणार आहेत. 

तायक्वांदो पॅरा-ऑलिम्पिक  स्पर्धा –

AVvXsEgePX3vxzUmNMQZgBSgedbCgW4LLSbCwAl5m5u8AMpqYkDBoUQhOsvguP2OC4PjyjAa0k6mhZYEpKfZT27Y7gP7WL4M5s73FOobRWCj7 aTJ3ZIBDzHwEd qNIwfqkTBE13euffTNfS5QF ouyE3sregB5l12XEL1GRLXAzmCp86TNa 3 6ia5R4cLD=w142 h161


या वर्षी 21 वर्षीय अरुणा तंवर टेबलटेनिसपटू पॅरा तायक्वांदो स्पर्धेत देशाचे प्रतिनिधीत्व करणार आहे. ती हरियाणाची रहिवासी आहे. दि. 2 सप्टेंबर रोजीच्या पात्रता फेरीपासून सामन्यांना सुरुवात होणार आहे.  



पॅरा-ऑलिम्पिक भारोत्तोलन स्पर्धा –

AVvXsEhh8c5Nriw fv 12kH llw4tb dxWGlOmpUXTsOTKFfwV5HFoWNq32MXX8 Yr2Jp6A JejuRlhNrBTE5d8iNRIg 8C6JzewAMjE McDiZ L j8iBkcqYZKFHoyu8B0GQq8siJ4Rrj0xBRCH0eRJWC5BYPHPnGEpFJy906oFhn7DagWFZGqV64N1uK P=w192 h162

जयदीप आणि सकीना खातून पॅरा-भारोत्तोलन स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. यामधील प. बंगालमधील सकीनाचे प्रशिक्षण बेंगळुरु येथ झाले आहे. तर, हरियाणाच्या जयदीपने रोहतक येथील राजीव गांधी स्टेडियममध्ये प्रशिक्षण पूर्ण केले आहे.


महिला पॅरा-ऑलिम्पियन सकीना –

AVvXsEg4TSrFzV HFI acD rIanw4b8p6 brRuC7Mcw9xuBq3uI5 az5VBHSmfA1O5MAFeTmsMmz6a7j9FHad4HtPAlKYSYaix0lv nTslZ0bDIAyPfgMhSzy2W2Bcfnt58IbyBFX6gnQY6yJy1 cbLSMPq0G BTQvi0uZOCJPx6ByLtGw 7H0UnjB35oF8=w123 h159

 सकीना एकमेव भारतीय महिला पॅरा-ऑलिम्पियन असणार आहे, जिने 2014 साली ग्लास्गो येथील स्पर्धेत पदक पटकावून राष्ट्रकुल स्पर्धेत विजय मिळविला आहे. त्याचबरोबर तिने 2018 च्या आशियाई स्पर्धांमध्ये रौप्य पदक मिळविनले आहे. तिला बालपणीच पोलिओची बाधा झाली होती. त्यानंतर सकीनाने दहावीनंतर भारोत्तोलन प्रशिक्षण सुरु केले. या स्पर्धांमध्ये जयदीप 65 किलो वजनी गटात खेळणार आहे. दि. 27 ऑगस्ट रोजी होणाऱ्या अंतिम फेरीत दोन्ही खेळाडूंचा सहभाग असणार आहे.

…………………………………………………

More News – 

राज्यातील दोन शिक्षकांना 2021 सालचे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर

भारताने आणि रशियाशी एके -103 रायफल्स खरेदी करण्यासाठी करार केला

“डिफेन्स इंडिया स्टार्टअप चॅलेंज 5.0” योजना | The “Defense India Startup Challenge 5.0” scheme

डिफेन्स इंडिया स्टार्टअप चॅलेंज 1.0 (DISC), इनोव्हेशन्स फॉर डिफेन्स एक्सलन्स (iDEX), डिफेन्स इनोव्हेशन ऑर्गनायझेशन (DIO) लाँच केल्यानंतर तीन वर्षांनी नवी दिल्ली येथे 19 ऑगस्ट रोजी DISC 5.0 लाँच करणार आहे.

तालिबान कोण आहेत ? | history, facts of Taliban

15 ऑगस्ट, 2021 रोजी तालिबान नावाच्या कट्टरपंथी इस्लामी शक्तीने अमेरिकेच्या सैन्याच्या माघारीनंतर देशातील बऱ्याच भागांवर नियंत्रण मिळवल्यानंतर काबूलमध्ये प्रवेश केला. तालिबानने अफगाणिस्तानवर 1996 पासून 2001 पर्यंत अमेरिकन सैन्य …..

15 ऑगस्ट 2021 पासुन राष्ट्रीय हायड्रोजन मिशन सुरू करण्यात आले | The National Hydrogen Mission was launched on 15 August 2021

75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2021 रोजी लाल किल्ल्यावरून राष्ट्रीय हायड्रोजन मिशनची घोषणा केली. भारताच्या ऊर्जा सुरक्षेला प्रोत्साहन देण्यासाठी हे मिशन सुरू करण्यात आले आहे.

वनरक्षकांना सॅटेलाइट फोन देणारे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान भारताचे पहिले राष्ट्रीय उद्यान बनले | Kaziranga National Park became the first national park in India to provide satellite phones to forest rangers

आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान बनले आहे, जे सॅटेलाइट फोनचा वापर करत आहे. आसामचे मुख्य सचिव जिष्णू बरुआ यांनी सुमारे 10 उपग्रह फोन काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाच्या वन कर्मचाऱ्यांना दिले. 

रामसरच्या यादीत आणखी चार भारतीय आर्द्र भूमींची भर पडली | Ramsarchaya Yadit Anakhi four Indian wetlands covered

या ठिकाणी लुप्तप्राय इजिप्शियन गिधाड ( Egyptian Vulture), मिलनशील लॅपविंग(Sociable Lapwing), सकर फाल्कन आणि डाल्मेटियन पेलिकन ( Saker Falcon and Dalmatian Pelican) यांचे वास्तव्य…….

भारताच 75 वा स्वातंत्र्य दिन इतिहास, महत्त्व आणि दुर्मिळ तथ्ये | India is the 75th Independence Day History, significance and rare facts

1911 मध्ये नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी रचलेल्या ‘भारतो भाग्यो बिधाता’ या गाण्याचे ‘जन गण मन’ असे नामकरण करण्यात आले. त्यानंतर २४ जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान सभेने राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले. लाल, पिवळा आणि हिरव्या तीन आडव्या पट्ट्या असलेला भारतीय राष्ट्रध्वज….

  …….For More Information Click hear…


भारतातील शेतकऱ्यांसाठीच्या योजना | Schemes for farmers in India


2021 इस्रोची GISAT-1 मोहीम अयशस्वी | 2021 ISRO’s GISAT-1 mission fails -भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचे भू-समकालिक उपग्रह प्रक्षेपण अयशस्वी ठरले GISAT-1 मिशन आपले लक्ष्य साध्य करण्यात अपयशी ठरले आहे. 12 ऑगस्ट रोजी सकाळी पृथ्वी निरीक्षण उपग्रह –03 लाँच करण्यात आले. या प्रक्षेपणाच्या पहिल्या दोन टप्प्यांत चांगली कामगीरी झाली. परंतु क्रायोजेनिकच्या वरच्या टप्प्यात तांत्रिक अडथळा आल्यामुळे रॉकेट उपग्रह योग्य कक्षेत ठेवण्यात अपयशी ठरला आहे.  
  …….For More Information Click hear…

जागतिक युवा दिन 2021 | International Youth Day 2021: Date, Significance, History & Theme 

पुढील 30 वर्षात जगाची लोकसंख्या 2 अब्ज लोकांनी वाढण्याची अपेक्षा शक्यता आहे. त्यामुळे असंख्य लोकांनी ओळखले आहे, की फक्त आराग्यदाई आहाराचे अधिक प्रमाणात उत्पादन करणे गरजेचे आहे. तसेच इतर महत्त्वाच्या आव्हानांना देखील संबोधित करणे आवश्यक आहे. जसे की 2030 च्या अजेंडाद्वारे अंतर्निहित जोडणी जसे गरीबी कमी करणे, सामाजिक समावेश, आरोग्य सेवा, जैवविविधता संवर्धन, आणि हवामान बदल या सर्वांचा समावेश आहे.

भारत बायोटेकच्या नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला मंजुरी | Approval for the second and third phase of India Biotech nasal vaccine

भारत बायोटेकने नाकावाटे लस घेण्यात येणारी लस बरनविली आहे. त्यासाठी DBT-BIRAC ची मदत घेण्यात आली. त्यातील पहिल्या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला नियामक मंडळाने मंजुरी दिली आहे.

सागरी सुरक्षेवर UNSC बैठक संपन्न | UNSC Meet on Maritime Security

समुद्रांच्या कायदेशीर वापरावर आणि किनारपट्टीवरील समुदायाच्या सुरक्षेवर भर देण्यावर चर्चा करण्यात आली. ज्याव्दारे आंतरराष्ट्रीय कायद्याची पुष्टी केली जाते. 1982 च्या संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात समुद्राच्या कायद्यासह इतर वैश्विक साधनांमध्ये बेकायदेशीर कारवायांचा सामना करण्यासाठी कायदेशीर बाबी स्पष्ट करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *