Verification: 4e7838d05962b884

वर्षभरात…..वाघांचा मृत्यू..! | Death of tigers throughout the year ..!

Spread the love

‘का’ होतोय वाघांचा मृत्यू..?

tiger 01
Tiger

२०२१ ह्या वर्षात देशभरात एकूण १२६ वाघांचा मृत्यू झाल्याचं उघडकीस आलंय. वाघांच्या मृत्यूची ही गेल्या दहा वर्षांतील सर्वाधिक संख्या आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांनी ही आकडेवारी जाहीर केलीय. या १२६ वाघापैकी ६० वाघ हे शिकार, अपघात आणि संरक्षित क्षेत्राबाहेरील मानव प्राणी संघर्षाला बळी पडले आहेत. यातील ३० टक्के वाघांचा मृत्यू व्याघ्रक्षेत्राबाहेर झालाय.

NTC २०१२ पासून सार्वजनिकरीत्या वाघांच्या मृत्यूची नोंद ठेवत आहे. ‘२०२१ मध्ये वाघांच्या मृत्यूची संख्या दशकातील सर्वाधिक असू शकते,’ अशी शक्यता आधीच वर्तवण्यात आली होती. कारण ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत देशात ९९ वाघ मृत्युमुखी पडले होते.

यापूर्वी २०१६ मध्ये वर्षभरात सर्वाधिक वाघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्या वर्षी देशात १२१ वाघ मृत पावले होते. २०२१ मध्ये सर्वाधिक ४४ वाघांचे मृत्यू मध्य प्रदेशात तर महाराष्ट्रात २६ आणि कर्नाटकात १४ वाघांचे मृत्यू झालेत.

महाराष्ट्रात मृत पावलेल्या या २६ वाघांपैकी १५ वाघांचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झालाय. उर्वरित ११ वाघ विषबाधा, शिकार, रेल्वे अपघात, वीज प्रवाहाचा स्पर्श यामुळे मृत्युमुखी पडलेत. यातील विषबाधा झालेल्या वाघांच्या मृत्यू प्रकरणांची चौकशी NTC करतेय.