Verification: 4e7838d05962b884

‘येथे’ दिसणार ( Supermoon )सुपरमून..!

Spread the love

यंदाच्या वर्षातील हे पहिले चंद्रग्रहण आहे. वर्षातील पहिल्या आंशिक सूर्यग्रहणानंतर suryagrahan वर्षातील पहिले चंद्रग्रहण १६ मे रोजी आहे. ‘सुपरमून’ चे दर्शनही पृथ्वीवरून पाहायला मिळणार आहे. भारतात १६ मे रोजी सकाळी ७ वाजता ग्रहण सुरू होणार आहे, तर दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी ते सुटेल. दरम्याण सकाळी ८.३० ते ९.३० ग्रहण स्पष्ट दिसू शकेल. पण हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही.

अमेरिकेच्या बहुतांश भागासह संपूर्ण दक्षिण अमेरिकेत चंद्रग्रहणाचा chandragrahan प्रत्येक टप्पा पाहता येईल. आफ्रिका, पश्चिम युरोपमधूनही चंद्रग्रहण बघता येईल. अशी माहिती नासाने दिली.

india-lunar-eclipse-and-its-impact-on-zodiac-sign
supermoon सुपरमून

नासाच्या Nasa वेबसाईटवर चंद्रग्रहण पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहे. नासा आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आणि अधिकृत यू-ट्यूब youtube चॅनलवरही चंद्रग्रहणाचे थेट प्रसारण करणार आहे. सुपरमून लालसर रंगाचा दिसेल. त्यामुळेच त्याला ‘ब्लड मून’ देखील म्हटले जाते. ग्रहणाच्या वेळी पृथ्वीच्या वातावरणात जितकी अधिक धूळ असेल तितका चंद्र लाल दिसेल, असे नासाकडून सांगण्यात आले. १६ मे रोजी होणारे चंद्रग्रहण चालू वर्षातील दोनपैकी पहिले चंद्रग्रहण असेल. दुसरे चंद्रग्रहण ८ नोव्हेंबरला आहे.