सध्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे राष्ट्रपती पदासाठी निवडणुकीची अधिसूचना निवडणूक आयोगानं जाहीर केली.
या पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २९ जून आहे. दरम्याण येत्या १८ जुलैला मतदान होणार आहे, तर २१ जुलैला मतमोजणी होईल.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद ( President Ramnath Kovind )यांचा कार्यकाळ यांचा २४ जुलैला संपुष्टात येत आहे. निवडणुकीसाठी ४ हजार ८०९ मतदार आहेत. त्यात संसदेच्या ७७६, तर विधानसभांच्या ४ हजार ३३ सदस्यांचा समावेश आहे. त्यांचं एकूण मतमूल्य १० लाख ८६ हजार ४३१ इतकं आहे.
