Verification: 4e7838d05962b884

अग्निवीरांना ( Agniveer ) प्रशिक्षणासोबत पदवी आणि सेवापूर्तीनंतर बँकिंग क्षेत्रात रोजगार..!

Spread the love

अग्निपथ ( Agnipath ) योजनेअंतर्गत सेनादलांमधे ४ वर्षाची सेवा पूर्ण केल्यानंतर अग्निवीरांना रोजगाराच्या ( Job )संधी उपलब्ध होण्यासाठी अर्थमंत्रालयानं नवी दिल्ली इथं सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका, वीमा कंपन्या आणि वित्तीय संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

दरम्यान, या अग्निवीरांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता ( Educational Qualification ) आणि कौशल्यानुसार अनुरूप लाभ आणि सवलतींसह रोजगाराच्या संधी सर्व वित्तीय संस्था शोधतील, असा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर कौशल्य सुधार, उद्योग उभारणीसाठी शिक्षण आणि स्वयंरोजगारासाठी त्यांना कर्ज उपलब्ध करूण देण्याची सुविधा शक्यता बँकांनी शोधाव्यात, असंही या बैठकीत निश्चित करण्यात आले.

अग्निवीरांना ( Agniveer ) प्रशिक्षणासोबत पदवी आणि सेवापूर्तीनंतर बँकिंग क्षेत्रात रोजगार
Agnipath