आषाढी वारीला नुकतीच सुरूवात झाली आहे. यामध्ये सहभागी झालेल्या वारकरी महिलांसाठी राज्य महिला आयोगाच्या वतीनं आरोग्यवारी हा उपक्रमाची राभविण्यात येत आहे. याची घोषणा या पूर्वीच करण्यात आली होती. त्याचा पुण्यात प्रारंभ करण्यात आला आहे.
पुण्यातलं पालखी विश्रामस्थळ असलेल्या निवडुंग विठोबा मंदिर इथं याची सुरूवात करण्यात आले. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या हस्ते उपक्रमाचं उद्घाटन झालं.
दरम्यान, या अंतर्गत पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून वारी काळात दर दहा ते वीस किलोमीटर अंतरावर वारकरी महिलांसाठी स्वच्छतालय आणि न्हाणी घराची व्यवस्था करण्यात येत आहे. शिवाय सॅनिटरी नॅपकिन पुरवठा आणि ते नष्ट करण्याचे यंत्र उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
