RajeNews_22_ऑगस्ट_2021
नुकत्याच ऑलिंम्पीक स्पर्धेनंतर आता पॅराऑलिंम्पीकचे सामने टोकियो येथे रंगणार आहेत. त्यामुळे भारताची टीम देखील रवाना झाली आहे. यंदाच्या पॅराऑलिंम्पिंक सामन्याचा ध्वजवाहक थंगावेलू मरिअप्पन हा असुन, यामधील भारतीय खेळाडूंची पहिली तुकडी दि. 18 ऑगस्ट 2021 रोजी टोकियो पॅरालिम्पिकसाठी रवाना झाली आहे.
पॅरालिम्पिक खेळ 24 ऑगस्ट रोजी एका आठवड्याच्या कालावधीत सुरू होतील. रिओ पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता मरिअप्पन थंगावेलू सोबत डिस्कस थ्रोअर विनोद कुमार आणि पुरुष भाला फेकणारा टेक चंद यामध्ये सामिल आहेत. तरी या आठ सदस्यीय गटाला इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर क्रीडा मंत्रालय, भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) आणि भारतीय पॅरालिम्पिक समिती (PCI) च्या अधिकाऱ्यांनी निरोप दिला.
“सन्माननीय पंतप्रधान आणि क्रीडा मंत्री यांच्यासह संपूर्ण देश आज आमच्यासाठी आनंदित आहे. पॅरालिम्पिकमध्ये भाग घेणारा प्रत्येक खेळाडू आधीच विजेता आहे आणि मी त्या सर्वांना शुभेच्छा देतो,” असे पीसीआयच्या अध्यक्ष दीपा मलिक यांनी सांगितले. त्या पॅरालिम्पिक तुकडीशी संवाद सादत होत्या. पीसीआयच्या अध्यक्षांसह 14 सदस्यांची आणखी एक तुकडी बुधवारी संध्याकाळी जपानच्या राजधानीकडे रवाना होईल असे सांगण्यात आले आहे.
Table of Contents
2020 उन्हाळी पॅरालिम्पिकविषयी थोडक्यात –
2020 ग्रीष्मकालीन पॅरालिम्पिक टोकियो पॅरालिम्पिक खेळ म्हणून ओळखले जातात. ते आगामी प्रमुख आंतरराष्ट्रीय मल्टी-स्पोर्ट पॅरास्पोर्ट्स इव्हेंट आहेत. या खेळांचे व्यवस्थापन आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समिती करते. या वर्षी 16 व्या उन्हाळी पॅरालिम्पिक खेळ आयोजित केले जात आहे. दरम्यान, हे खेळ 24 ऑगस्टपासून टोकियोमध्ये आयोजित केले जातील आणि 5 सप्टेंबर 2021 रोजी संपतील. असे वेळापत्रक ऑलिप्मिक आयोजकांकडुन सांगण्यात आले आहे.
कोरानामुळे पॅरालिम्पिक सामन्यांवर झालेला परिणाम –
पॅरालिम्पिक हे खेळ आधी 25 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2020 पर्यंत नियोजित होते. परंतु कोविड -19 महामारीमुळे ते पुढे ढकलण्यात आले. त्याचे आयोजन या सप्ताहापासुन होत आहे. या स्पर्धा भरत असलेले ठिकाण म्हणजे टोकियो येथील परिसरात आणीबाणीच्या स्थितीमुळे प्रेक्षकांना परवानगी देण्यात आलेली नाही
जपानमध्ये आयोजित तिसरे पॅरालिम्पिक –
सन 1964 च्या खेळांनंतर टोकियोमध्ये दुसऱ्यांदा या खेळांचे आयोजन करेण्यात आले आहे. तर एकूणच, जपानमध्ये आयोजित होणारे हे तिसरे पॅरालिम्पिक असणार आहे. कारण याआधी सन 1998 च्या हिवाळी पॅरालिम्पिकचे आयोजन जपान देशाने केले होते.
बॅडमिंटन आणि तायक्वांदो 2020 च्या खेळांमध्ये सादर होणार –
आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समिती (IPC) आयपीसी ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. ती पॅरालिम्पिक साठी एक प्रशासकीय संस्था आहे. ही संस्था पॅरालिम्पिक खेळाचे आयोजित करते. त्याचबरोबर एकुण नऊ खेळांसाठी आंतरराष्ट्रीय महासंघ म्हणून काम करते. आयपीसीची स्थापना 22 सप्टेंबर 1989 रोजी डसेलडोर्फ, पश्चिम जर्मनी येथे झाली. हे “पॅरालिम्पिक क्रीडापटूंना क्रीडा उत्कृष्टता प्राप्त करण्यासाठी आणि जगाला प्रेरणादायक आणि रोमांचक बनवण्याच्या” मिशनसाठी कार्य करते. याचे मुख्यालय बॉन, जर्मनी येथे आहे.
टोक्यो पॅरा-ऑलिम्पिक स्पर्धेत 54 खेळाडु भारताचे प्रतिनिधीत्व करणार
दि. 25 ऑगस्टपासून आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरु होणाऱ्या पॅरा-ऑलिम्पिकमध्ये भारताचे 54 क्रीडापटू भाग घेत आहेत. एकुण 9 क्रीडा प्रकारांमध्ये ते देशाचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. या स्पर्धेमध्ये तिरंदाजी, अॅथलेटीक्स (ट्रॅक आणि फील्ड), बॅडमिंटन, जलतरण, भारोत्तोलन खेळांचा समावेश असणार आहे. तरी यंदाच्यावर्षी पॅरा-ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारा, हा सर्वात मोठा चमू ठरला आहे. या सर्व सहभागी 54 क्रीडापटूंना टार्गेट ऑलिम्पिक पोडियम म्हणजे TOPS या योजनेतून प्रशिक्षण मिळाले आहे. अशी माहिती पी.आए.बी या वृत्तसंस्थेने दिली.
टेबल टेनिस पॅरा-ऑलिम्पिक
भारताकडुन टेबल टेनिस या खेळ प्रकारात महिला एकेरीत आणि महिला दुहेरीत प्रतिनिधीत्व गुजरात येथील भाविना पटेल आणि सोनलबेन पटेल करणार आहेत. तरी या दोघींचीही पात्रता फेरी दि. 25 ऑगस्ट रोजी होणार आहे. शिवाय उपांत्यफेरी आणि अंतिम फेरीचे सामने 28 आणि 29 ऑगस्ट रोजी खेळवण्यात येणार आहेत.
तायक्वांदो पॅरा-ऑलिम्पिक स्पर्धा ––
या वर्षी 21 वर्षीय अरुणा तंवर टेबलटेनिसपटू पॅरा तायक्वांदो स्पर्धेत देशाचे प्रतिनिधीत्व करणार आहे. ती हरियाणाची रहिवासी आहे. दि. 2 सप्टेंबर रोजीच्या पात्रता फेरीपासून सामन्यांना सुरुवात होणार आहे.
पॅरा-ऑलिम्पिक भारोत्तोलन स्पर्धा –
जयदीप आणि सकीना खातून पॅरा-भारोत्तोलन स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. यामधील प. बंगालमधील सकीनाचे प्रशिक्षण बेंगळुरु येथ झाले आहे. तर, हरियाणाच्या जयदीपने रोहतक येथील राजीव गांधी स्टेडियममध्ये प्रशिक्षण पूर्ण केले आहे.
महिला पॅरा-ऑलिम्पियन सकीना –
सकीना एकमेव भारतीय महिला पॅरा-ऑलिम्पियन असणार आहे, जिने 2014 साली ग्लास्गो येथील स्पर्धेत पदक पटकावून राष्ट्रकुल स्पर्धेत विजय मिळविला आहे. त्याचबरोबर तिने 2018 च्या आशियाई स्पर्धांमध्ये रौप्य पदक मिळविनले आहे. तिला बालपणीच पोलिओची बाधा झाली होती. त्यानंतर सकीनाने दहावीनंतर भारोत्तोलन प्रशिक्षण सुरु केले. या स्पर्धांमध्ये जयदीप 65 किलो वजनी गटात खेळणार आहे. दि. 27 ऑगस्ट रोजी होणाऱ्या अंतिम फेरीत दोन्ही खेळाडूंचा सहभाग असणार आहे.
More News –
राज्यातील दोन शिक्षकांना 2021 सालचे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर
भारताने आणि रशियाशी एके -103 रायफल्स खरेदी करण्यासाठी करार केला
“डिफेन्स इंडिया स्टार्टअप चॅलेंज 5.0” योजना | The “Defense India Startup Challenge 5.0” scheme
तालिबान कोण आहेत ? | history, facts of Taliban
15 ऑगस्ट 2021 पासुन राष्ट्रीय हायड्रोजन मिशन सुरू करण्यात आले | The National Hydrogen Mission was launched on 15 August 2021
वनरक्षकांना सॅटेलाइट फोन देणारे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान भारताचे पहिले राष्ट्रीय उद्यान बनले | Kaziranga National Park became the first national park in India to provide satellite phones to forest rangers
रामसरच्या यादीत आणखी चार भारतीय आर्द्र भूमींची भर पडली | Ramsarchaya Yadit Anakhi four Indian wetlands covered
भारताच 75 वा स्वातंत्र्य दिन इतिहास, महत्त्व आणि दुर्मिळ तथ्ये | India is the 75th Independence Day History, significance and rare facts
1911 मध्ये नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी रचलेल्या ‘भारतो भाग्यो बिधाता’ या गाण्याचे ‘जन गण मन’ असे नामकरण करण्यात आले. त्यानंतर २४ जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान सभेने राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले. लाल, पिवळा आणि हिरव्या तीन आडव्या पट्ट्या असलेला भारतीय राष्ट्रध्वज….
भारतातील शेतकऱ्यांसाठीच्या योजना | Schemes for farmers in India
2021 इस्रोची GISAT-1 मोहीम अयशस्वी | 2021 ISRO’s GISAT-1 mission fails -भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचे भू-समकालिक उपग्रह प्रक्षेपण अयशस्वी ठरले GISAT-1 मिशन आपले लक्ष्य साध्य करण्यात अपयशी ठरले आहे. 12 ऑगस्ट रोजी सकाळी पृथ्वी निरीक्षण उपग्रह –03 लाँच करण्यात आले. या प्रक्षेपणाच्या पहिल्या दोन टप्प्यांत चांगली कामगीरी झाली. परंतु क्रायोजेनिकच्या वरच्या टप्प्यात तांत्रिक अडथळा आल्यामुळे रॉकेट उपग्रह योग्य कक्षेत ठेवण्यात अपयशी ठरला आहे.
…….For More Information Click hear…
जागतिक युवा दिन 2021 | International Youth Day 2021: Date, Significance, History & Theme