Verification: 4e7838d05962b884

India Vs England भारताचा इंग्लंडवर 10 गडी राखून विजय

Spread the love
Red White Modern Tutorial Youtube Thumbnail 5 1
India Vs England

भारत आणि इंग्लंड ( India Vs England ) यांच्यात एकदिवसीय क्रिकेट मालिका खेळविण्यात येत आहे. लंडनमधे ओव्हल मैदानावर झालेल्या पहिल्याच सामन्यात भारताने इंग्लंड संघावर 10 गडी राखून विजय मिळवला.

सुरूवातीला भारताने नाणेफेक जिंकली. त्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारताच्या बॉलर्सनी उत्कृष्ठ कामगिरी केली. परिणामी इंग्लंडचा डाव 25 षटके आणि 2 बॉलमध्ये अवध्या ११० धावात तंबुत परतला.

या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलरनं याने ३० धावा केल्या. विशेष म्हणजे इंग्लंडचे ४ फलंदाज शून्य धावांवर बाद झाले. जसप्रीत बुमराह याने 6 आणि मोहमद शामीनं 3 खेळाडू बाद केले. विजयासाठीचं 111 धावांचे लक्ष्य भारताने 19 व्या ओव्हरमध्ये पार केले. रोहित शर्मानं 76 तर, शिखरने 31 धावा केल्या.