Verification: 4e7838d05962b884

Why doge instead of Twitter bird ? ट्विटरची चिमणी आता दिसणार नाही !

Spread the love

Elon Musk Twitter Bird Vs Doge : इलॉन मस्कने ट्विटरची ओळख बदलली आहे. आधी ब्लू टिकमध्ये बदल करण्यात आला होता आणि आता त्याचा लोगो म्हणजेच पक्षी काढून टाकण्यात आला आहे. मस्कने ट्विटर बर्डच्या जागी Dogecoin च्या Doge चे चित्र दिले आहे. म्हणजेच नवीन लोगो Doze आहे. मात्र त्याने असे का केले ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Why did Elon Musk change his Twitter logo?

Twitter bird Dogecoin elon musk
Musk change his Twitter logo

Elon Musk इलॉन मस्क यांनी कंपनी खरेदी केल्यानंतर ट्विटरवर सतत बदल होत आहेत. काही असे बदल करण्यात आले आहेत. ज्यांची अपेक्षाही कोणालाही नव्हती. असाच एक बदल म्हणजे ट्विटरचा लोगो बदलणे. लोगो बदलणे ही कोणत्याही ब्रँडसाठी मोठी गोष्ट असते. कारण तीचा संबंध पब्लीसिटीसी असतो.

असे असले तरी मस्क यांनी ट्विटरचा लोगो म्हणजेच ‘बर्ड’ ऐवजी डोगे बदलला आहे. सोमवारी त्यांनी कोणतीही माहिती न देता हा लोगो बदलला आहे. त्यामुळे नेटकऱ्यांमधून संमिश्र प्रतिक्रीया येत आहेत. हा बदल केवळ वेब व्हर्जनमध्ये करण्यात आला आहे. ट्विटरच्या मोबाईल अॅपवर ( Mobile App ) हा पक्षी अजूनही लोगो म्हणून दिसणार आहे.

Why did Musk change the logo?

इलॉन मस्कने गेल्या वर्षी 44 अब्ज डॉलर्समध्ये ट्विटर विकत घेतले. जर तुम्हाला क्रिप्टोकरन्सी आणि एलोन मस्कमध्ये स्वारस्य असेल, तर तुम्हाला Dogecoin बद्दल माहिती असेल. मस्क डोगे मीम्स देखील शेअर करत आहे. तो अनेक प्रसंगी Dogecoin चा प्रचार करताना दिसला आहे. ट्विटरच्या ऑफरपूर्वी मस्कने एक ट्विट केले होते, ज्याच्या प्रतिसादात वापरकर्त्याने ‘ट्विटर विकत घ्या… आणि बर्ड लोगोच्या जागी डोगे’ असे उत्तर दिले होते.

What is Doge Logo ?

Dogecoin ही एक लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी आहे आणि ती 2013 मध्ये तयार करण्यात आली होती. बिली मार्कस आणि जॅक्सन पामर यांनी 2013 मध्ये Dogecoin लाँच केले होते. त्यात शिबा इनू कुत्र्याचा फोटो आहे. विशेष म्हणजे बिटकॉइन ( bitcoin ) आणि इतर क्रिप्टोकरन्सीची ( Cryptocurrency ) खिल्ली उडवण्यासाठी Dogecoin ची निर्मिती करण्यात आली होती, मात्र 2021 मध्ये ही क्रिप्टोकरन्सी प्रसिद्धीच्या झोतात आली होती.त्याच्या चर्चेचे कारण देखील होते एलोन मस्क.

A case has been filed against Musk !

इलॉन मस्कचा लोगो बदलल्याची चर्चा असतानाच, एका व्यक्तीने मस्कविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मस्कच्या वकिलाने 31 मार्चला गेल्या वर्षी केलेले हे प्रकरण संपवण्याचे आवाहन केले आहे. ज्या व्यक्तीने मस्कवर खटला भरला आहे त्याने डोगेकॉइनमध्ये बरीच गुंतवणूक केली होती. जेव्हा क्रिप्टोकरन्सी मार्केट फुटले तेव्हा त्याचा परिणाम गुंतवणूकदारांवर झाला. Dogecoin मध्ये गुंतवणूक केल्यानंतर पैसे गमावल्याचे त्या व्यक्तीने सांगितले. यामुळे त्यांनी इलॉन मस्क आणि त्यांची कंपनी टेस्ला ( Tesla ) आणि स्पेसएक्स ( spacex ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.

Join For Daily News Update
👇🏻👇🏻
https://chat.whatsapp.com/KreWYRwlhuGHexyCKK1dsa