
Tamil actor vijay thalapathy : नुकत्याच आलेल्या लिओ ( Lio ) या फिल्ममध्ये दमदार अभिनयाची झलक दाखविणारा तामिळ अभिनेता थलापती विजयने ( Thalapathy Vijay ) राजकीय पक्षाची घोषणा केलीय. ‘Tamilaga Vettri Kazhagam’ या राजकीय पक्षाच्या स्थापनेची घोषणा त्याने केलीय.
विजय म्हणाला, आम्ही आज आमचा पक्ष ‘Tamilaga Vettri Kazhagam’ नोंदणी करण्यासाठी EC कडे अर्ज करत आहोत. आगामी 2026 च्या विधानसभा निवडणुका लढवणे, जिंकणे आणि बदल घडवून आणणे हे आमचे ध्येय आहे.
सध्याच्या राजकीय वातावरणाची आपणा सर्वांना जाणीव आहे. एकीकडे प्रशासकीय गैरव्यवहार आणि भ्रष्ट राजकीय संस्कृती, आणि एक फूट पाडणारी राजकीय संस्कृती जी आपल्या लोकांमध्ये जातीच्या आधारावर फूट पाडण्याचा प्रयत्न करते. तामिळनाडूमध्ये ( Tamilnadu ) मूलभूत राजकीय बदलाची गरज आहे ज्यामुळे एक निस्वार्थी, पारदर्शक, जात-मुक्त, दूरदर्शी, भ्रष्टाचारमुक्त आणि कार्यक्षम प्रशासन होऊ शकेल.
निवडणूक आयोगाची मान्यता घेतल्यानंतर ( election commission of india ) पक्षाने जाहीर सभा आणि कार्यक्रम आयोजित करण्याची योजना आखली आहे. या मेळाव्यांदरम्यान ते आपली धोरणे, तत्त्वे आणि कृती योजना मांडतील, तसेच ध्वज आणि पक्षाचे चिन्ह जाहिर करणार असल्याचे सांगण्यात आले.
तथापि, अभिनेत्याने सांगितले की पक्ष 2024 च्या सार्वत्रिक निवडणुका लढवणार नाही किंवा आगामी निवडणुकीत कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नाही.