Verification: 4e7838d05962b884

Manoj Jarange On Raj Thackeray : राज ठाकरे सध्या कुणाची तरी सुपारी घेऊन बोलतायेत : मनोज जरांगे

Spread the love
Manoj Jarange On Raj Thackeray
Manoj Jarange On Raj Thackeray

Manoj Jarange On Raj Thackeray : आनंद व्यक्त करत होता, मग पुन्हा उपोषण कशासाठी करता ? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय, तर विजयोत्सव साजरा झाला यात जरांगे पाटील यांना कोणता विजय मिळाला ? असंही राज ठाकरे म्हणाले होते यावर मनोज जरांगे यांनी पलटवार केलाय.

आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही माघारी आलो का? सध्या राज ठाकरे कुणाची तरी सुपारी घेऊन बोलत असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केलाय.

Manoj Jarange Vs Raj Thackeray :कायद्यात दुरूस्ती कदण्यासाठी अधिसुचना काढावी लागते. राज साहेब ठाकरे यांना माननारा मोठा वर्ग आहे. ते असं बोलतील अशी अपेक्षा नाही. हे राजकीय सुपाऱ्या घेतल्यासारखे डाव आहेत. तीथं गेल्या गेल्या आरक्षण ठेवल्याल असतं का ? या बरं माझया जागेवर, दया बरं आरक्षण. काय तरी बोलूण नाही चालत. आणा बरं आरक्षण आम्ही तुमच्या मागे उभे राहतो. असं म्हणत राज ठाकरे कोणाचीतरी सुपारी घेऊन बोलत असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केलाय.