Verification: 4e7838d05962b884

‘पायलटविना’ उडणारे अमेरिकन हेलिकॉप्टर..! |American helicopter flying without a pilot ..!

Spread the love

युद्धनीतीत अमेरिकेने रचला नवा इतिहास..!

helicopter

भारतात हेलिकॉप्टर helicopter कोसळून बड्या अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच अमेरिकेने हेलिकॉप्टर उड्डाणात नवा इतिहास रचला आहे. ब्लॅक हॉक हे हेलिकॉप्टर पायलटशिवाय केवळ ऑटोमेशनद्वारे चालवून दाखवले आहे. विशेष म्हणजे त्यानंतर ते सुखरूप लँड पण झाले. येत्या काळात या नव्या क्रांतीचा मोठा फायदा जगभरात होऊ शकतो.

अमेरिकन हेलिकॉप्टर ची वैशिष्टे

प्रथम उड्डानात हे हेलिकॉप्टर ३० मिनिटे हवेत होते. त्याने काही वेळेताच ४००० फुटांची गाठली उंची गाठली. ११५ ते १२५ मैल प्रती तास एवढ्या वेगाने झेप घेतली. हे हेलिकॉप्ट 357 किलोमीटर प्रती तास क्षमतेने उड्डान करू शकते. त्याचबरोबर 9989 किलो वज़न एकदाच वाहून नेण्याची यात क्षमता आहे. १६० कोटी रुपये किमतीचे हे हेलिकॉप्टर आहे.

तयार केले आभासी शहर

ब्लॅक हॉकच्या चाचणीसाठी अमेरिकेच्या केंटुकी शहरात तयार करण्यात आली होती. कॉम्प्युटरच्या साहाय्याने चक्क आभासी शहर तयार करण्यात आले होते आभासी उंच इमारतींचे अडथळे पार करत हे हेलिकॉप्टर यशस्वीरीत्या उड्डाण करत होते.

ब्लॅक हॉक कोणाकोणाकडे?

सध्या ब्लॅक हॉक अमेरिका, जपान, कोलंबिया, द. कोरिया, इस्रायल, ब्राझील, चीन, मेक्सिको, फिलीपइन्स, स्लोव्हाकिया, स्वीडन, नेवान, तुर्की या देशांकडे आहे.